Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नवीन नगर रोड परिसरात नगर परिषदेने लावलेल्या काही वृक्षांची अज्ञात व्यक्तीकडून कत्तल केल्याचे समोर आले आहे. चांगली बहरू लागलेले ही झाडे रात्रीतून तोडण्यात आली असून तोडलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा देखील गायब करण्यात आला असून केवळ खोड शिल्लक राहिले आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. हरित संगमनेरला विघ्न संतोषींकडून अडथळा: ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नगर रोड परिसरात बस स्थानक चौकापासून ते खाली इथापे हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. झाडांच्या संरक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आला आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने यावेळी देखील येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब (ठाकरे) पक्षाचाच खासदार निवडून जाईल. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये, असे शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या बैठकीमुळे निर्माण झाला गोंधळ: दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच गद्दार खासदारांबद्दल बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचीदेखील खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कतारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या पोलीस फौज फाट्यासह सोमवारी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने कारवाई चुकविण्यासाठी वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने अनेक वाहनांवर कारवाई केली. पीआय स्वतः रस्त्यावर वाहन चालकांना शिस्त लागणार का? गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरांमध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर देखील शहरात बहुतांशी ठिकाणी वाहतुकीची कोंडी जाणवत आहे. त्यातच विशिष्ट वाहन चालकांमुळे अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अचानकपणे कारवायांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे या कारवाया वेळी ते स्वतः रस्त्यावर उतरत असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील चिकणी या गावी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या शाखेची स्थापना करण्यात आली. समाजात जनजागृतीची आवश्यकता: बजरंग दल तालुका संयोजक कुलदिप ठाकूर यांनी यावेळी चिकणी गाव व पंचक्रोशीमध्ये यापूर्वी लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आल्याने याबाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. देवधर यांचे व्याख्यान: तसेच मंगळवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता मालपाणी लॉन्स, संगमनेर या ठिकाणी सुनील देवधर यांच्या ‘राष्ट्रीयत्व व महिला सुरक्षा’ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानासाठी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यांच्या झाल्या निवडी: यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या चिकणी शाखा अध्यक्षपदी विशाल गुंजाळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिला सबलीकरण व ग्रामीण महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती तसेच कोरोना संकटात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या कार्याचा दिल्ली सरकारने राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन गौरव केला आहे. यांच्या उपस्थितीत यांनी स्वीकारला पुरस्कार: नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, पंडित बल देवराज वर्मा, जीएसटीचे कमिशनर सारांश महाजन, धरमपाल भारद्वाज, जसबीरसिंग करारा, अनुप चावला यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. थोरात यांच्यावतीने हा राष्ट्रीय एकता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील जेष्ठ महिला केशरबाई कचरू सानप व साकुर येथील रेऊबाई नान्नर यांनी स्वीकारला. सोळा राज्यातील व्यक्तींना पुरस्कार: भारतीय स्वातंत्र्याच्या ७६…
एकमुखी मागणी – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घ्या! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार आहे या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक देखील अनेक जण आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा यासाठी आग्रही असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले. आढावा बैठकीला हे होते उपस्थित: हंडोरे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, हेमंत ओगले, समन्वयक सचिन गुंजाळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – येथील अर्थकारणात अग्रेसर असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या मोठ्या आर्थिक अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हा उपनिबंधाकडून विशेष लेखापरीक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि राजकीय नेते भाऊसाहेब कुटे यांना देखील या प्रकरणी दोषी धरण्यात आले असून आरोपींमध्ये त्यांचा देखील रहाण्याची शक्यता आहे. अपहाराचा नेमका आकडा समोर येणार: गुन्हे दाखल करण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा केव्हा दाखल होतो याकडे ठेवीदार सभासदांचे लक्ष लागले आहे. या संस्थेत ठेविदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. नेमका किती रुपयांचा अपहार आहे याची अद्याप सहकार विभागाकडून स्पष्टता नसली तरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक सरकारी वकील पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संगमनेरच्या घुले पाटील असोसिएटच्या ॲड. मनीषा सोनवणे यांनी यश मिळविले. यांनी मिळविले यश: संगमनेर बार असोसिएशनच्या सदस्य असलेल्या ॲड. मनीषा सोनवणे यांच्यासह ॲड. स्वाती घुले, ॲड. रेश्मा मंडलिक, ॲड. विक्रांत भालेराव, ॲड. भारत काळे, ॲड. शशिकांत माने, ॲड. चंद्रकांत सुपे, ॲड. गणेश अनर्थे व ॲड. अजीज मणियार यांची असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर (सहाय्यक सरकारी वकील) म्हणून निवड झाली आहे. ॲड. मनीषा सोनवणे या संगमनेर न्यायालयातील ॲड. अनिल घुले यांच्या ज्यूनियर म्हणून काम पाहतात. अथक परिश्रमातून त्यांनी हे यश प्राप्त केल्याचे ॲड. अनिल घुले यांनी महाराष्ट्र संवाद…
रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात लोकसभेत देण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा आणि त्याला सत्ताधार्यांनी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर जगाने पाहिलं. डोक्यात गेलेली सत्ता, या सत्तेचा अहंकार आणि सत्ता आपल्यासाठीच असल्याचा माज पाहून अनेकांना हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचंच आश्चर्य वाटत होतं. गेल्या नऊ वर्षांच्या सत्तेत जी दुषणं मोदींनी विरोधकांना दिली त्यात जराही फरक जाणवला नाही. सत्तेतील एखादा मंत्री किंवा खासदार खोटं बोलला तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. त्याला तितकं महत्व देत नाहीत. पण देशाचा प्रमुख असलेला पंतप्रधानच खोटं बोलू लागला तर ती लोकशाहीची आणि संसदेची थट्टाच होय. अर्थात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी मधून पुणेकरांची सुटका होण्यासाठी आता हवेतून चालणाऱ्या बस सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री होते उपस्थित: केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. गडकरी म्हणाले: पुण्यातील वाढती वाहनांची संख्या, प्रदूषण, कचरामुक्त पुणे यासाठी गडकरी यांनी उपाय सुचवत माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्काय बसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गाव पातळीवर असलेल्या प्रत्येक यंत्रणेने सतर्क आणि संवेनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. यापुढे निष्काळजीपणामुळे एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहायला हवे. अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी प्रशासनाला केल्या. घेतली अधिकाऱ्यांची बैठक: कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची राज्य महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा करत याप्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेत या प्रकरणी आढावा घेतला. काय होती घटना: वडाळी (नाशिक) येथील रहिवासी असलेली रेणुका किरण गांगुर्डे ही महिला आपल्या माहेरी कारवाडी (ता. कोपरगाव) येथे आली…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत असुन घरोघरी जाऊन बीएलओ मतदारांची नाव नोंदणी करत आहेत. नागरिकांनी बीएलओंना मदत करुन आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यांची केली नियुक्ती: नव मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील 107 महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर बीएलओ, महसूल दूत व महाविद्यालयाचे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातुन नव मतदारांची शंभर टक्के नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे. 12, 13 ऑगस्टला मोहीम: गृहनिर्माण संस्थामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची व भटक्या विमुक्त जमातीतील तांडा, वस्त्या येथील नागरिकांच्या मतदार नाव नोंदणीसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य व स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांना तमिळनाडू सरकार व चेन्नईच्या एशिया इंटरनॅशनल कल्चर अॅण्ड रिसर्च विद्यापीठातर्फे “डॉक्टरेट आणि लोकहित सेवारत्न” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. राबविले वेगवेगळे उपक्रम: थोरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अहमदनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे विशेष सामाजिक योगदान राहिलेले आहे. यांच्या उपस्थितीत झाला सन्मान: त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेन्नई विद्यापीठाने त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जिनूरामा शर्मा, सिने अभिनेते शिवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बस स्थानकामध्ये एसटी बसच्या चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आयेशा मुनीर बेग (वय 55 वर्ष, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकामध्ये सिन्नर आगाराची नासिक-अहमदनगर (क्रमांक एम.एच 20 बीएल 4056) ही बस आली होती. या बसच्या चाकाखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आयेशा बेग संगमनेर बस स्थानकावर आपल्या नातेवाईकांसह आल्या होत्या. बस चालक बस स्थानकामध्ये आपल्या ताब्यातील बस स्थानकाबाहेर नेण्याच्या बेतात असताना अचानकपणे त्या बसच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या बेग…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वातंत्र्यदिनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा व नगरपालिका सांगण्यात उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली. मुख्याधिकारी वाघ आमदार थोरात यांचे मानले आभार: निवेदनात करण्यात आलेली मागणी मान्य करण्यात आली असून प्रत्यक्षात कार्यवाहीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी करत घरांचे मोजमाप घेऊन मालमत्ता कराचे फॉर्म भरण्यास सुरुवात केल्याने नागरिकांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख कतारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व संगमनेरचे लोकप्रतिनिधी, माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे. काय होती मागणी: शहरातील संजय…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची सर्वात मोठी लोक चळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाने हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले असल्याने हा परिसर हिरवाईने फुलला असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर हिरवाई हीच खरी समृद्धी असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. वृक्षारोपण: हिवरगाव पावसा येथील देवगड डोंगर परिसरात संगमनेर तालूका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रीया संघाच्यावतीने दंडकारण्य अभियानांतर्गत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे होते उपस्थित: यावेळी प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – श्रेय लाटण्यासाठी राजकीय दबाव वापरत संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाने ग्रामीण रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेला दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला आहे. कतारी यांनी काय म्हटले आहे: दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविल्या जातात. यासाठी गेल्या महिन्यात संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील साडेतीनशे दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. राजकीय दबावातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G-20 अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर झाला. रविवारी दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G20 अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. थोरात यांची निवड: डॉ. जयश्रीताई थोरात या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात कार्यरत असून अत्यंत दुर्दम्य असणाऱ्या ब्लड कॅन्सर या आजारातील रुग्णांना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली असून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि. १३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर संगमनेरमध्ये उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. हे राहणार उपस्थित: या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहू कानडे, यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. शेतकरी सुखावलाय: आषाढातल्या बहुप्रतीक्षेनंतर अखेरीस अधिक श्रावणात पावसाचे दमदार आगमन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहत असलेला शेतकरी राजा…
