Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एन.एच.एस. फाउंडेशन या नामांकित संशोधन संस्थेच्या दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीमधील फेलोशिप पूर्ण केल्याची माहिती डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली. इंग्लंड मधील सर्वात जुन्या व सुप्रसिद्ध असलेल्या एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्टचे दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची स्थापना 1909 मध्ये झालेली असून या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असून तेथे असलेल्या 17 सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये नामांकित व निष्णात ऑर्थोपेडिक सर्जनद्वारा दररोज सुमारे 50 मोठ्या व जखमेच्या आर्थोपेडिक सर्जरी होत असतात. या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीचे महिनाभराचे विशेष प्रशिक्षण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करत यावर्षी देखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मंगळवारी माजी मंत्री, आमदार थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम कुऱ्हे, पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. यावेळी डख यांनी यशोधन कार्यालयातील कामकाजाची पद्धत समजावून घेतली. भेटी दरम्यान डख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्या नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याचा धक्का बावीस वर्षे वयाच्या एका बेरोजगार तरुणाला जीएसटीच्या आलेल्या 24 लाख 61 हजार रुपयांच्या बिलाच्या नोटीसमुळे बसला आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा पोलिसांपुढे मांडली. पोलिसांनी देखील या बेरोजगार तरुणाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरातील रहिवासी असलेल्या देवेंद्र कुमारला 24 लाख 61 हजार रुपयांच्या थकीत जीएसटी बिलाची नोटीस आली. बांधकाम मजूर असलेल्या देवेंद्र कुमारला या नोटीसमुळे चांगलाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात…

Read More

नूतन पदाधिकार्‍यांचे पदग्रहण; मालपाणी उद्योग समूहाकडून 21 लाखांची देणगी महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर- इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी झालेली निवड वैश्विक संघटनेकडून मिळालेली समाजसेवेची खूप मोठी संधी आहे. डिस्ट्रिक्टमधील हजारो महिलांच्या साथीने सेवाकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी यापुढे सांघिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 च्या नूतन चेअरमन रचना मालपाणी यांनी केले. इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट मधील 76 शाखांमधील 630 महिलांच्या उपस्थितीत ढोले पाटील लॉन्सच्या सभागृहात पार पडला. यावेळी मालपाणी बोलत होत्या. इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या व्हाईस चेअरमन ममता गुप्ता, मावळत्या चेअरमन मुक्ती पानसे यांच्यासह डिस्ट्रिक्टच्या व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, सेक्रेटरी डॉ. आशा देशपांडे, खजिनदार…

Read More

आजच्या बदलत्या काळात तत्त्व जिवंत ठेवण्याचा संघर्ष : कुलगुरू संजीव सोनवणे चिन्नण्णाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्रासमोर: आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. जयहिंद लोक चळवळ आयोजित चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हिरालाल पगडाल लिखित ‘चिन्नण्णा’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले. स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्‍यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. राज्‍य शासनाने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आगामी काळ हा निवडणुकांचा राहणार असून नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने व क्षमतेने लढवत गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संघटक शुभांगी पाटील यांनी केले आहे. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर तालुका महिला आघाडीच्या सक्षमीकरणाअंतर्गत नियोजनासाठी शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पाटील बोलत होत्या. महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटक शुभदा शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सपना मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आशा केदारी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख / सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० जून २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या वर्षभराच्या कालावधीत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे सारखे विविध प्रकल्प, योजना व विकासकामांना गती देत उत्तर अहमदनगर जिल्ह्याचा विकासाचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पाठबळामुळे वर्षभरात विविध प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. उत्तर नगर पर्यायाने शिर्डीच्या विकासाला चालना मिळाली आहे. या वर्षभराच्या कालावधीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 88 वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. मो. स. गोसावी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बी. वाय. के. कॉलेजचे प्राचार्य पद भूषविले. त्यानंतर पुढील 37 वर्ष त्यांनी या महाविद्यालयात शैक्षणिक योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा गेल्या साठ वर्षांपासून ते सांभाळत होते. डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानातून लाखो विद्यार्थी आज मोठ्या पदांवर, उद्योजक, राजकारणी, वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष / प्रवीण पुरो महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्‍या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. 7 जुलै) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्यास सर्वाधिक 1801 रुपयांचा तर टोमॅटो 1400 रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. गुंजाळ म्हणाले, शुक्रवारच्या लिलावामध्ये बाजार समितीत एकूण 26444 कांदा गोण्यांची आवक झाली. या लिलावामध्ये चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1801 रुपयांचा, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदाही 400 ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वयात येण्यापूर्वीच दोन महिने अगोदर अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेणाऱ्या सारोळे पठार येथील सतीश हरिभाऊ फटांगरे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे हा प्रकार घडला. आरोपी सतीश फटांगरे याने फिर्यादीच्या अल्पवयीन नातीस कशाचे तरी आमिष दाखवून फिर्यादीच्या राहत्या घरातून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पळवून नेले, अशा आशयाची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वायाळ तपास करत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अखेर मंत्रालयात कार्यालयासाठी जागा मिळाली. पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अजित पवारांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर शासकीय कार्यालय देण्यात आलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना मंत्रालयात नेमकं कुठलं कार्यालय देणार यावरून राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सहाव्या मजल्यावर एकच कार्यालय होते. मात्र, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधलं कार्यालय देण्यात आलं आहे. पवार यांच्या कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी या दोघांचेही कार्यालय रिकामे करण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र ‌न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. त्यामुळे शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी जाहीर केले. मात्र आता काँग्रेसनेच या पदावर दावा केला आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचाच विरोधी पक्ष नेता असेल असे सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचे संकेत दिले. थोरात म्हणाले, राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार जर सत्तेतून खाली खेचायचे असेल तर आपल्याला महाविकास आघाडी भक्कम ठेवावी लागणार आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विरोधी पक्ष नेत्याचे नाव घोषित केले जाईल. काँग्रेस सभागृहातील 45 आमदार असलेल्या सर्वात मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथीचे सत्र सुरूच आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणून गोऱ्हे यांच्याकडे बघितले जात होते. त्यामुळे गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश आश्चर्यकारक मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या गोऱ्हे यांच्याकडे महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून बघितले जात…

Read More