Author: Annant Ppangarkar
अंतिम भाग | प्रवीण पुरो देशाचा चौकीदार म्हणून स्वत:ची पाठ थोपटणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक नुकसान कोणाचं केलं असेल तर ते महाराष्ट्राचं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षांत बसलेला विविध मार्गातील फटका लक्षात घेतला तर या राज्याने, राज्यातल्या जनतेने विशेषत: बेरोजगारांनी मोदी नावाच्या चौकीदाराला कदापि माफ करायला नको. दुर्देवाने सुर्याजी पिसाळांच्या अवलादी याच महाराष्ट्रात जन्मल्याने चौकीदार शांत बसेलच याची खात्री देता येत नाही. सत्ता हा त्यांचा मतलब राहिला आणि चौकीदाराने केलेली लूट या पिसाळांनी राज्यातल्या जनतेच्या बोकांडी मारली. देशावर नोटबंदी लादताना चौकीदाराने सारी थोतांडं हातोहात पुढे केली. भ्रष्टाचार थांबेल, दहशतवाद संपेल, काळापैसा बाहेर येईल आणि रोजगाराला चालना मिळेल, असल्या…
शनिवार, दि. ४ मे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, गेल्या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ख्रिश्चन मुसलमानांपेक्षा जास्त अन्याय हिंदूंवर झाले. राज्यसभेत समोर आलेली ही माहिती छापण्याची गोदी मीडियाची हिम्मत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवं, मात्र ते मानवतेच न राहता वसुलीच कार्यालय झाल आहे. मोदींनी इन्कम टॅक्स,…
शनिवार, दि. ४ मे गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केल आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल असे सांगत भाजपाचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात, ही काँग्रेसचे आमदार थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आंबेडकर नगरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींचा राजकारण हे अतिशय भयानक असून काँग्रेस पक्षाने त्यांना २०१२ मध्ये…
शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही. आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला…
शुक्रवार, दि. ०३ मे गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या…
शुक्रवार, दि. ३ मे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या छबिना मिरवणुकीत तरुणावर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील शेवगावमधील शहर टाकळी येथे गुरुवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४ वर्ष, रा. शहर टाकळी, शेवगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात मृत तरुणाचा भाऊ संकेत संजय आपशेटे याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार व विकास संजय कोल्हे या पाच आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत आपशेटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री…
शुक्रवार, दि. ३ मे नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी नग्नावस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसविल्याने आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली केली यामुळे पुन्हा एकदा राज्य हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे…
शुक्रवार, दि. ३ मे पोटगीपोटी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा करणाऱ्या पत्नीचा न्यायालयाच्या परिसरात चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीसह चार जणांना वैजापूर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोयिऊद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. ३ ऑक्टोबर २०२० मध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेत केशरबाई कारभारी गवळी (८०) रा. भिंगी बोरसर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी (८०), त्याची दोन मुले भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२१) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर (३०) रा. गारज यांना…
शुक्रवार, दि. ३ मे सोने व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले अविनाश जाधव, वैभव ठक्कर यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी असलेल्या शैलेश कांतीलाल जैन यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. जैन हे सोन्याचा व्यवसाय करतात. जैन त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये वैभव ठक्कर यांच्यासोबत व्यवहार करत असताना अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच-सहा जण सुरक्षा रक्षकासह बळजबरीने ज्वेलरी शॉप मध्ये आले. तेथे जैन यांचा मुलगा सौमील याला मारहाण केली. तसेच पाच कोटी रुपये…
गुरुवार, दि. २ मे राज्यातील हाय व्होल्टेज लढतीमधील एक प्रमुख लढत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये होत आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होत आहे. ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी काल महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. विखे यांना दिलेला पाठिंबा हा या मतदारसंघात महा विकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेचे माजी उपसभापती आणि पारनेरचे माजी आमदार असलेल्या विजय औटी यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने…
गुरुवार, दि. २ मे देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बिअर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजाराची लाच घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाच लुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला. खलील खुर्शीद शेख (वय ४० वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर, कोपरगाव, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) असे लाचखोर भरारी पथकाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शेख याच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कोपरगावमध्ये ही कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या सापळा पथकात…
गुरुवार, दि. २ मे लोकसभा निवडणुकीचे वातावरण राज्यात चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर राज्यात प्रचार सभांनी आता मोठा वेग घेतला आहे. पंतप्रधानांपासून राज्यातील बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते, भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांना देखील राज्यातून मोठी मागणी असून काँग्रेससह महाविकास आघाडीचा किल्ला राज्यात ठीक-ठिकाणी लढवितांना थोरात दिसत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील निवडणुका पार पडल्या. या मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली येथे थोरात यांच्या प्रचार सभा झाल्या. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस…
बुधवार दि.१ मे – संगमनेर आता मनातील किंतु-परंतु नको, मी पालकमंत्री आहे माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. उगीच लाईटली घेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका, शंभर टक्के काम करून संगमनेरमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजेत. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. गटातून मताधिक्य मिळणार नसेल तर उमेदवारी मागू नका असा थेट इशाराच राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभासाठी मंत्री विखे बुधवारी आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, निवडणूक थोड्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे.…
शिर्डी, बुधवार – दि. १ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक यांचा पत्ता शिर्डी शासकीय विश्रामगृहातील कृष्णा कक्ष आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९०२२०१४२०३ व ई-मेल आयडी shirdipoliceobserver@gmail.com असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून प्रियांका आठरे (महिला पोलीस उपनिरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय विश्रामगृहात सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील. असे निवडणूक निर्णय…
बुधवार, दि.१ मे – पाथर्डी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे या भाजपमधील आमच्या सारख्या जुन्या निष्ठावंतांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सोमवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर म्हणाले, विखे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून त्यांच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावले नाही. त्यांचे साडेतीन कार्यकर्तेच त्यांचा कारभार पाहतात. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी भाजपचे काम करतो मात्र माझ्यासह जे पंकजा मुंडे यांचे काम करतात त्यांना भाजपमध्ये नंतर आलेले राजळे व विखे हे सातत्याने डावलण्याचे काम करतात. ह्या दोघांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शेवगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी…
बुधवार, दि.१ मे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या भरारी पथकाच्या हाती निवडणुकीआधीच मंगळवारी मोठ घबाड लागलं आहे. मुंबईत भरारी पथकाने केलेल्या दोन मोठ्या कारवाया केल्या आहे. सायनमध्ये केलेल्या कारवाईत एका कारमधून कोट्यावधी रुपये जप्त केले. तर आदल्या दिवशी सोमवारी दुपारी दादरपूर्व भागात शिंदेवाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३० एप्रिल) निवडणूक भरारी पथकाला सायन परिसरातील एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई करत कारमधून तब्बल १ कोटी ८७…
अहमदनगर – बुधवार, दि.१ मे निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी अहमदनगरमधील एका हॉटेलमधून साठ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकासह अन्य दोघांचा समावेश असल्याचे बोलले जाते. निवडणूक शाखेचे भरारी पथक अधिकारी शहानवाज तडवी यांना काही लोक निवडणुकीच्या संबंधाने हॉटेल यश ग्रँड मध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जात रूम क्रमांक ४०२ मध्ये ही कारवाई केली. दरम्यान भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत प्रत्येकी २० हजार रुपयांची तीन पाकिटे आणि दोन मोकळी पाकीट जप्त केली. या पैशाचा हिशोब देता…
मंगळवार, दि.३० एप्रिल अवघ्या तेरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक पदाधिकारी मिळेल तिथे बोलण्याची संधी सोडत नाहीत, याच पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना यात्रेत बोलण्यास विरोध झाल्याने त्यांना तेथून निघून जावे लागले. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार प्रचारात दंग असले तरी कार्यकर्त्यांची मात्र त्यांना अद्यापही म्हणावी अशी फारशी साथ मिळत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उमेदवाराकडून पूर्ण होत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवाराबाबत हे चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या तेरा दिवसात सर्वप्रमुख उमेदवारांची…
वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत… मंगळवार, दि.३० एप्रिल देशभरात सुरू असलेला ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्याय व्यवस्थेमधील दबाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, राज्या-राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, देशभरात निर्माण झालेली अस्थिरता यामुळे देशात भाजप विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळू शकणार नाही. याचबरोबर राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी ४० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते.…
मंगळवार, दि.३० एप्रिल तब्बल गेली १५ वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर, सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे… योगिता आणि तीचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच…
