Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील तडीपारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळे ऐन दीपावलीत ठाकरे यांना दिलासा मिळाला. कल्याण पोलिसांनी २०१० साधी बजावलेल्या तडीपारीच्या नोटीसवर ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी आणि त्याबाबतची न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली. ठाकरे यांच्या याचिकेवरील कामकाज पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने यासंबंधीचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) या संबंधीचा निकाल न्यायालयाने देत ठाकरे यांच्यावरील गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या तुरुंगातून पळून जाणाऱ्या चौघांना पकडण्यात अहमदनगर एलसीबीचे पोलीस यशस्वी ठरले. या चौघांसोबत त्यांचे दोन साथीदारे पोलिसांनी पकडले आता मात्र चौघांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींना संगमनेर न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांनी बुधवारी पहाटे संगमनेरच्या तुरुंगातून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या चौघांचा त्यांना मदत करणाऱ्या दोघा जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेरजवळ पकडण्यात आले. मदत करणाऱ्या दोघांमध्ये एक जण संगमनेरचा व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. या कामासाठी योगदान दिले. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनावेळी योगदान देणारे दूरच मात्र प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता. ही बाब चांगली नाही. मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत असून यापुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी काम केले जाणार आहे. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. वडगाव पान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जल पूजन कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यभरातील 15 हजार सरकारी शाळा बंद करून 65 हजारापेक्षा जास्त सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे शिक्षण बंद होणार असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा यासाठी संगमनेर छात्र भारतीने राज्य सरकारसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. शुक्रवारी हा आकाश कंदील टपाल खात्यामार्फत पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शाळा बंदी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून सरकारी शाळा बंद झाल्या तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे. शाळा बंद होणे म्हणजे मोफत मिळणारे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जळगाव – बुधवारी पहाटे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून कोठडीचे गज कापून चार आरोपींनी सिनेस्टाईल पलायन केले होते. या चौघा आरोपींना त्यांच्या दोघा साथीदारांना अहमदनगर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी शेळगाव (ता. जामनेर) येथे एका शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पळालेले चौघेही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आल्याने त्यांचा पळून जाण्याचा घटनाक्रम आता उलगडणार आहे. बलात्कार, खून, कुणाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांना इतर कैद्यांसोबत जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या…

Read More

राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. थोरात म्हणाले, दूध संघाने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळ पडला आहे. मात्र तालुके दुष्काळी जाहीर झाल्याने अशा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकरी वंचित राहू नये, यासाठी दुष्काळाचे मूल्यमापन करताना तालुक्याऐवजी गाव हा निकष करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. डॉ. तांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र येथे दुष्काळ जाहीर झाला नाही. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीच्या पेरण्यांमध्ये अडचणी आहे. नैसर्गिक आपत्ती, बदलते वातावरण या सगळ्या बाबींमुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्यापही या अपहार प्रकरणातील मुख्य मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे कुठे दडून बसला याचा शोध लागत नसताना त्याचे कुटुंब मात्र अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टापर्यंत पोहोचले आहे. भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबियांना संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता त्याचे कुटुंब औरंगाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा यात समावेश आहे. यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो यानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर @ अनंत पांगारकर भल्या पहाटे संगमनेरच्या तुरुंगातील चार आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर गार्डच्या बंदोबस्तावरील तीन पोलीस कर्मचारी अडचणीत सापडले असतानाच दुसरीकडे जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे बुधवारचा दिवस संगमनेर आणि जळगाव या दोन्ही कारागृहातील गार्डसाठी काळा दिवस ठरला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. संगमनेर मध्ये झालेल्या आरोपी पलायन प्रकरणावेळी एक महिला कर्मचारी ड्युटीवर होती. तर जळगावच्या प्रकरणात दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह दोन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : कोणतेही शुल्क न आकारता साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन शिर्डीमध्ये शुक्रवारपासून (१० नोव्हेंबर) रोज सायंकाळी लेझर शो सुरू केला जाणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी दिली. शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना दर्शनानंतर काय? हा प्रश्न अनेक वर्षापासून पडत असतो. अशा हजारो भाविकांना सहकुटुंब आनंदाची अनुभूती मिळावी, यासाठी साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन या लेझर शोची निर्मिती करण्यात आली आहे. या लेझर शोचे उद्घाटन शुक्रवारी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जय मालपाणी म्हणाले, रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर साई तीर्थ थीम पार्कच्या प्रांगणात निशुल्क सादर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमधून पोलीस दलाचे नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार आरोपींनी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे. या कोठडीतून आरोपी पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली अजून पळून गेलेल्या चारही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली. राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा असे कोठडीचे गज कापून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वजण संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेर मधील नामांकित महिला वकील सीमा काळे-सातपुते यांचा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवार्ड सोहळ्यात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. ॲड. सातपुते-काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आयोजित कार्यक्रमात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराचे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या व कल्याणी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक डॉ. सुनीताताई मोडक, निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी : ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्‍हणजे महायुती सरकारच्‍या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु असलेल्‍या विविध योजनांच्‍या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाने सुरु असलेल्‍या विकासात्‍मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली राहाता तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतींमध्‍ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींमध्‍ये आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील ७ ग्रामपंचायतींमध्‍ये विजयी झालेल्‍या उमेदवारांचे अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आमचे नेते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज केंद्र व राज्यातील सरकारवर जनतेची पूर्णतः नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अमली पदार्थांची तस्करी यामुळे जनता नाराज आहे. सरकारचे सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेत रोशाचे वातावरण असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद यश मिळविले आहे. नवनिर्वाचित सदस्य सरपंचांचा थोरात यांनी सत्कार केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जाते. ग्रामपंचायतमध्ये झालेला विजय हा विकास कामांचा आणि कार्यकर्त्यांच्या एकीचा आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महसूल मंत्री विखे गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होऊन देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले असल्याने ‘थोरातच सरकार’ असल्याचे संगमनेरकरांनी दाखवून दिले. संगमनेर तालुक्यात झालेल्या सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद विजय मिळविला. तर संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्दची ग्रामपंचायत विखे समर्थकांकडे, पठार भागातील घारगावची ग्रामपंचायत शिवसेना (ठाकरे) गटाचे जनार्दन आहेर यांनी आपल्या गटाच्या ताब्यात ठेवली. सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी आणि बोरबन या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी काँग्रेसचा झेंडा फडकविला. तर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : तीन महिने पीडितेवर अनैसर्गिक शरीर संबंध केल्याचा तसेच शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. पहिला विवाह लपवून ठेवत पीडित महिलेसोबत दुसरा विवाह करून तीन महिने अनैसर्गिक शारीरिक संबंध करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली असा आरोप करत पीडित महिलेने संगमनेर तालुक्यातील आरोपी विरोधात सांगवी (पुणे) पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : शनिवारपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष”…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वर्धा : रखडलेल्या कामाविषयी विचारणा केल्याने आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून आमदार कांबळे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील देवळी तालुक्यामधील सोनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य गणेश सातव यांनी गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार कांबळे यांना रखडलेल्या कामाविषयी विचारणा केली होती. या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले तरीही अद्याप काम सुरू झाले नाही याबद्दल सातव यांनी नाराजी व्यक्त केल्याने कांबळे यांनी त्यांना मारहाण केली. कांबळे काँग्रेसचे आमदार असल्याने मारहाणीच्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा, अशी मागणी खासदार रामदास तडस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. यातील एक आरोपी तब्बल महिनाभर पोलिसांच्या कस्टडीत आणि ताब्यात असताना देखील न्यायालयासमोर पोलीस या आरोपीचा सहभाग सिद्ध करू शकले नाही, जी गोष्ट पोलिसांना सहज उपलब्ध झाली असती ती पोलीस तपासामध्ये कोठेही न आल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर केला. या घटनेमुळे पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घटनेतील दोन आरोपी अद्यापही तुरुंगात असून एक-एक करत पाच आरोपी जामिनावर मुक्त झाले तर एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यान यातील एक आरोपी जामिनावर मुक्त करताना न्यायालयाने तपासा संदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पूरो नियतीची चक्र कशी फिरत असतात याचा धडा सध्या भाजप घेत आहे. याला कोणी कर्माचं फळ म्हणो वा नियतीचं चलचक्र. पापाचा घडा हा कधी तरी भरतोच. ती कोणत्या रुपात येतील हे कोणीही सांगू शकत नाही. केलेल्या पापांची फळं कधी तरी भोगाल, असे शाप महाराष्ट्रातल्या असंख्य राजकारण्यांनी भाजपच्या डोक्यावर फोडले आहेत. आज त्याची प्रचिती या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना येत असेल. यावेळी निमित्त झालंय ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं. आरक्षणात खोडा घातल्याचे सारे दोष आपल्यावर येतील, असं त्या पक्षाच्या नेत्यांनी जराही मनात आणलं नसेल. आज ते घडतंय हे मात्र त्यांना मान्यच…

Read More