Author: Annant Ppangarkar

मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपी अद्यापही बाहेरच! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेकडो ठेवीदारांच्या कष्टार्जित 81 कोटींच्या ठेवींना चुना लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे संगमनेरच्या विश्वासार्ह सहकार विश्वाला मोठा धक्का पोहोचला आहे. 81 कोटी रुपयांचा अपहार हा दोन राजकीय कुटुंबीयांभोवती केंद्रित झाला असून ठेवीदारांच्या ठेवीतून वाहणाऱ्या दूध गंगेत हात धुवून घेणाऱ्या, राजकीय वरदहस्त असलेल्या व जिल्हा परिषदेसह संगमनेरातील अन्य संस्थांमध्ये पदाधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपींपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नसल्याने पोलीस तपासाबद्दल संशयाची सुई निर्माण होताना दिसत आहे. पाच आरोपींच्या अटकेनंतर अटक सत्र थांबले: गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने आणि तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सुरुवातीलाच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सत्तेतील धुसफूस वाढत असलेल्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. या सत्तेतील एक मुख्यमंत्री दुसर्‍या उपमुख्यमंत्र्याच्या म्हणण्याप्रमाणे काम करतो तर दुसरा उपमुख्यमंत्री मनाला येईल ते निर्णय घेतो. स्वार्थी सत्तेत आपले सारेच लाड पुरवले जात नसतात. स्वार्थापोटी भाजपबरोबर सत्तेत गेलेल्या एकनाथ शिंदेंची सत्ता राबवताना जी अवस्था होते आहे तशीच अजित पवारांचीही झालेली आहे. घरचं स्वातंत्र्य आणि परघरचा सासुरवास यातला फरक या दोन्ही नेत्यांना कळला असेल. आपल्याला जड होणार्‍या व्यक्तीचा काटा काढण्याचं कारस्थान अशा सत्तेत दिसून येतं.  एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांवर जसा भाजपचा आक्षेप असतो तसं अजित पवारांविषयीही सुरू आहे. त्यांच्यापुढे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदार आणि संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांना शनिवारी या प्रकरणाची सुनावणी होऊन पुढील आदेश होईपावेतो अटक न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अंतरिम जामीन अर्ज: संगमनेरच्या आदर्श सहकाराला छेद देत शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. एस. यु. कवडे यांच्यामार्फत अंतरीम जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अटकेचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना येथील घटने संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका एका ट्विटद्वारे स्पष्ट केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. ठाकरे म्हणाले, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. कालपासून लक्ष ठेवून: ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातून वृषाली कडलग, लक्ष्मीकांत ईडलवार, मंगेश कडलग व नरेंद्र राठोड यांची निवड झाली आहे. मुंबईत शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 108 शिक्षकांचा समावेश: राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2022-2023 या वर्षीच्या राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, जामखेड व राहुरी येथील शिक्षकांचा समावेश आहे. पुणे विभागातून कडलग: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा संगमनेरात सकल मराठा समाज, संगमनेरकरांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. बस स्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असून यात सकल मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. विश्रामगृहावर बैठक: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच संगमनेरातदेखील सकल मराठा समाज आणि संगमनेरकर संतप्त झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे. ट्विट: जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज संदर्भात थोरात यांनी समाज माध्यमावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलन चिरडणे योग्य नाही: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे, हा आजवरचा इतिहास आहे. केंद्र, राज्यात महाशक्तीचे सरकार मात्र मार्ग निघत नाही: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला गालबोट लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह आठ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात सरकारी वकील सरकार पक्षाचे म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळते. यांनी केला अर्ज: 81 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून…

Read More

श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तनाचे आयोजन समाजाला दिशा दाखविणारी माध्यमे दिशाहीन महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – मालपाणी उद्योग समूहातील कामगार आपल्या कामातच विठ्ठलाचे रूप बघणारे आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना आजकाल नाटक, चित्रपट, समाज माध्यमांनी विकृतीची परिसीमा गाठली. टीव्ही मालिकांनी तर कहरच केल्याचे स्पष्ट करत बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविले जात असल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे यांनी व्यक्त केली. येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासानिमित्त आफळे महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी उपस्थित होते. आफळे महाराज म्हणाले, सभ्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडलेल्या दोघा जणांकडून ठिबक सिंचन पाईप चोरीचे रॅकेट समोर आले आहे. या चोरट्यांनी काही पाईप चोरीची कबुली दिली असून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. हे आहेत आरोपी: फरदिन इसाक शेख व नवशाद इशाक शेख (दोन्ही रा. अकोलेनाका, संगमनेर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींकडून संगमनेर शहरातील दोन व संगमनेर तालुका अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकेक गुन्ह्याची दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय आरोपी विरोधात चोरीचे आणखी काही गुन्हे देखील दाखल आहेत. चोऱ्यांचे सत्र होते सुरू: गेल्या काही दिवसापासून संगमनेरमध्ये जल जीवन मिशन व शेतकऱ्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  शिर्डी – एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुरस्काराचे वितरण: प्रवरानगर (शिर्डी) येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अमळनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. पुरस्कार वितरण सोहळा: प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम: संगमनेरमधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्यावतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशनचा यावर्षीचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार यांना जाहीर झाला आहे. अध्ययन, अध्यापनासाठी पुरस्कार: फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात नव संजीवनी ठरावा असा हा पुरस्कार पवार यांना देण्यात येणार आहे. रविवारी वितरण: शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार पवार यांना रविवारी (3 सप्टेंबर) बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात वितरित केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शासनाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठुबे वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. मंगळवारपासून होते बेपत्ता: वसंत विहारच्या धर्मवीर नगर परिसरात राहणारे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे मंगळवारपासून बेपत्ता होते. ते घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठुबे यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री आढळला मृतदेह: बुधवारी रात्री अक्षय ठुबे यांचा मृतदेह कोकणी पाडा परिसरातील जंगलात आढळून आला. तुबे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वतःसह कुटुंबातील सदस्य व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने स्वतःच्या व्यक्तिगत शुभेच्छांच्या लाखो रुपयांच्या जाहिराती ठेवीदारांच्या पैशातून वृत्तपत्रांना दिल्याचे समोर आले आहे. कारनामे: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर या घोटाळ्यामागील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याचे एक-एक कारनामे समोर येत आहे. यातील बहुतेक कारनामे पोलिसांकडे दाखल असलेल्या फिर्यादीत (FIR मध्ये) नोंदविण्यात आले आहे. कुटुंबातील सात जणांचा समावेश: संगमनेरच्या सहकारी पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक अपहार म्हणून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराकडे बघितले जाते. विशेष म्हणजे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठे पाऊल उचलले होते. अत्याचारासाठी आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून सहा जणांना पोलिसांनी सहआरोपी केले आहे. यातील कॅफे मालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींसह लॉज चालक, कॅफे मालक अशा पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी अटक केलेल्या राहुल गौतम भालेराव या कॅफे मालकाला बुधवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विविध ठिकाणी यांनी केला अत्याचार: संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केवळ संगमनेरच नव्हेतर आसपासच्या चार जिल्ह्यांमधील उद्योग, व्यवसाय आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देवून देशाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या संगमनेर मर्चन्ट्स सहकारी बँकेची 58 वी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. गतआर्थिक वर्षाचे चेअरमन ओंकार सोमाणी व विद्यमान चेअरमन संतोष करवा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान 3 मोहीमेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. मावळलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा विक्रमी नफा झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावर्षी संस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप केले जाणार आहे. प्रतिमा पूजन: प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ.अशोक पोफळे, नीलेश जाजू, नंदकुमार भडांगे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – विनयभंगाच्या दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी, तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकरता तीस हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार विरोधात नाशिकच्या लाच लूचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे. एक ते दीड लाखाची मागणी: संदीप गडाख असे शिर्डी पोलीस ठाण्याच्या कारवाई झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. यासंदर्भात नासिक लाच लूचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. नाशिकच्या तक्रारदाराविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या एका गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी तसेच तक्रारदारावर तडीपारीची व एम.पी.डी.ए. नुसार कारवाई करू नये यासाठी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी पंचासमक्ष शिर्डीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर व संगमनेर शहरातील प्रत्येक वार्डात काँग्रेसची जनसंवाद यात्रा होणार असून या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा उलगडा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. येथे झाली बैठक: यशोधन कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जनसंवाद यात्रेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणार: केंद्र सरकार हे संपूर्ण…

Read More