Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. सर्वच छत्रपती महिलांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. देशात महिलांना समान हक्क दिल्याने महिला यशस्वी घोडदौड करत आहे. सर्वच क्षेत्रात नारीशक्तीची ताकद मोठी असल्याने अशा काही महिलांचा शिवसेनेच्या महिला संपर्क नेत्या शुभांगी पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन नाना घोलप, उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसईबी मधील शमी गणपतीच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी घडवून आणलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बँक महाविकास आघाडीच्या ताब्यातून निसटली आहे. अनपेक्षितपणे आघाडीच्या मतांची फोडाफोडी करत भारतीय जनता पक्षाने बँक आघाडीच्या ताब्यातून खेचून आणली. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी बुधवारी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. शेळके यांच्या रूपाने अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर माधवराव कानवडे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद काँग्रेसकडे होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बँकेवर वर्चस्व असल्याने शेळके यांच्या रिक्त जागी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ॥ बाळासाहेब भोर संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक महत्व लाभलेल्या पेमगिरीत १० मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त दिवसभर विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पेमगिरीत शिवजयंती ही विविध सामाजिक उपक्रम तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा मोठया दिमाखात पार पडला होता. सालाबादप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी रात्री शहागडावर शिवजन्मोत्सव सोहळा व फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. सकाळी संपूर्ण गावातून छत्रपतींची पालखी प्रदक्षिणा व महाआरती होईल व संध्याकाळी शिवशाहिर प्रा. अरविंद घोगरे (जालना) यांच्या भेदक पहाडी आवाजातील शिवकालीन पोवाडा, शिवगीते, शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मराठमोळ्या शाहिरी बाण्यातून सादर होणार आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : पुण्याच्या कसबा पेठ व पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणुकांचे निकाल बघता जनतेने सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची झालेली युती जनतेला मान्य नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत असून सत्ताधाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची भीती वाटत आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पवार म्हणाले राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यात अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. श्रीरामपूरची घटना देखील ताजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. पण आपण एकत्र लढलो तर निश्चितचं त्यांचा पराभव करु. कसबापेठ मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. आता जनता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात नाकारत आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र होऊनच निवडणुका जिंकायच्या आहेत. तरीदेखील कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करायच आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मंगळवारी अहमदनगरमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, कोणी ताम्रपत्र घेऊन जन्माला येत नाही. आम्ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज महिला दिनाचे औचित्य साधीत सामाजिक बांधिलकीतून स्त्रियांच्या आजारासाठी मोफत तपासणी व उपचार शिबिराचे बुधवारी ८ मार्चला संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीरोगतज्ञ वैद्य स्मिता अतुल देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली. संगमनेरमधील श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिन महिलांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन स्मिता देशमुख व अतुल देशमुख यांनी केले आहे. शिबिरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून जास्त जाणे, कमी जाणे, पाळी वेळेवर न येणे, लवकर येणे, पाळी दरम्यान ओटी, छाती, कंबर, पाय दुखणे. स्त्री बीजाची वाढ न होणे. गर्भ पिशवीला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे : राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे, ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झालेले असल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देत दिलासा दिला आहे. ते म्हणाले,” सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निर्देशही दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आपल्या कुटुंबीयांसह धुळवड साजरी करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळीच मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भात परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष प्रवीण देशमुख याला नागपूर सायबर सेल पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. कसबा निवडणुकीनंतर देशमुख याने नितीन गडकरी यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फेक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष असून प्रविण देशमुख असे त्याचे नाव आहे. आरोपी प्रवीण देशमुख नागपूर सायबर सेलच्या ताब्यात होता. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने प्रवीण देशमुखची चार तास…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अवकाळी पावसाने अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगलीसह काही भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. होळीचा सण राज्यभर साजरा होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्याच्या बहुतांश भागात थैमान घातले आहे. त्यामुळे अवकाळीच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत केली जाईल असा आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, हरभरा, मूग अधिक शेती पिकांचे प्रचंड नुकसान होऊन पिके भूईसपाट झाले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांवर संकट आले आहे, अशी भावना विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारची भूमिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधारमध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी गरजेचे असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात 17 लाख 49 हजार 888 आधार धारकांचे आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे या आधारधारकांनी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नागरिकांना जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार माहितीचे अद्यावतीकरण करावे लागणार आहे. अथवा नागरिकांना स्वतः my Aadhaar…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहादा (जि. नंदुरबार) मी अपक्ष आमदार आहे आणि अपक्षच राहणार असून कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही आहे. मला खात्री आहे या संदर्भात राज्य सरकार आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यातून चांगला मार्ग काढतील. या योजनेसाठी राज्य सरकारवर आपण दबाव आणण्याचे काम करणार आहोत, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन आदरणीय दोन दिवसाच्या सुट्टीत तांबे मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदार संघात आले होते. यावेळी शहादा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण आग्रही राहणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत पहिल्या चर्चेत आपण हा मुद्दा देखील मांडला असल्याचे आठवण त्यांनी पत्रकारांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण आणि पर्यटक, गिर्यारोकांचे साहस केंद्र असलेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात १३० प्रजातीचे पक्षी आढळून आले आहेत. कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात पहिलेच पक्षी सर्वेक्षण २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पार पडले. हे सर्वेक्षण कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य, वन्यजीव विभाग नाशिक आणि आऊल कन्सर्वेशन फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आले. यामधे महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील १६ पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते. अभयारण्याच्या दोन वनपरिक्षेत्रामध्ये प्रत्येकी ४ असे अभयारण्य मिळून ८ मार्ग आखण्यात आले होते. हे मार्ग उंच-सखल जंगला नुसार कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ किलोमीटर असे आखण्यात आले होते. सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी वनरक्षक आणि वनमजूर यांच्या सहकार्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र व गोवा या राज्यातील महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘खेलो इंडिया – दस का दम’ या नावाने योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या 12 मार्च रोजी पुण्यातील सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या या स्पर्धा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. वय वर्ष 9 ते 18 आणि 19 ते 55 अशा दोन गटात होणार्या या योगासन स्पर्धेत पारंपरिक व कलात्मक या दोन क्रीडा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही महिला स्पर्धकाला सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी तयार केला गेलेला अभ्यासक्रम नॅशनल योगासन…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात केलेले ट्विट एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील सार्थक कापडी या तरुणा विरोधात नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडी हा युजर मुंबईतला असून तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. असं सांगण्यात येत आहे. “एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला xxxxx असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव xxxxxxxx. एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा xxx बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे”, असं त्याने या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. तसंच “चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये मातृ-पितृ पूजन या उपक्रमाचे आयोजन करून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नको असा संदेशच जणू दिला. शाळेत चिमुकल्यांनी आई-वडिलांचे पूजन करून आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा दिन साजरा केला. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सद्यस्थितीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, हग डे असे वेगवेगळे डे साजरे करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे. मात्र, आपली भावी पिढी सात्विक आणि सुसंस्कृत व्हावी यासाठी चिमुकल्यांना चांगले संस्कार मिळावे या उदात्त हेतूने देशमुख मळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने मातृ-पितृ पूजन व बाल…
वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही: महसूल मंत्री विखे पाटील
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही. माफीयांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्दा मोठा संघर्ष केला. त्याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्करीला लगाम घातला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी हरीभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर…
होळी विशेष ● रवींद्र एरंडे अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत. होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्या (गवर्या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा. “होळीच्या गवर्या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग…
महाराष्ट्र संवाद न्यूज कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त…
