Author: Annant Ppangarkar

मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८ बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 17000 शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या विरोधात छात्र भारतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी संगमनेरमध्ये शंभर एसटी बसेसला सरकारच्या निषेधाचे पोस्टर चिटकविण्यात आले आहे.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने सरकारी शाळांना प्राधान्य देत या शाळांचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सरकारी शाळांना टाळे लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकाच देशातील शिक्षणाचे हे चित्र विदारक आहे. कमी पट संख्येच्या राज्यभरातील जवळपास 17000 मराठी शाळांवर सरकारच्या या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील दोघा व अकोले तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारांस प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे. रमेश संतू पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकण (रा. धांदरफळ खुर्द, संगमनेर) आणि ऋतिक किसन बांडे (रा. खडकी ता. अकोले) अशी या हद्दपार केलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. अकोले आणि संगमनेर तालुका पोलिसांकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे या आरोपी विरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. मंगरूळ यांनी तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात म्हणजेच प्रत्येकी 100 रुपयात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. दसरा मेळाव्या आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ केल्याने राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा त्यांच्या गैरहजेरीत होणार आहे. खासदार राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होऊन त्यांची सुटका होईल असा अंदाज होता मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा वाढ केली आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच राहावे लागेल. 10 ऑक्टोंबरलाच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुसंस्कारित पिढी घडवण्याबरोबरच स्त्रियांनी स्व-संरक्षणार्थ सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शारदा कर्पे यांनी केले. विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी संगमनेर प्रखंडाने दुर्गावाहिनीच्या स्थापना दिनी दुर्गाष्टमी निमित्त संगमनेरातील माऊली फर्निचर हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कर्पे “जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूजा जाधव उपस्थित होत्या. कर्पे म्हणाल्या, सरस्वती नको सावित्री हे राजकारण सध्या सुरू आहे, सरस्वती ही विद्येची देवी असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा पुढाकारामुळेच आपण सुशिक्षित झालो आहे, त्यामुळे दोन्हीही आमच्यासाठी पूज्यनीय आहे. या कार्यक्रमात हिंदु संस्कृती, महिला सक्षमीकरण, लव-जिहाद सारख्या अनेक विषयांवर प्रबोधन केले गेले. पारंपारिक वेशभूषा,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भाजप नेते माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या एकहाती साम्राज्याला हादरा देत सत्तांतर करण्यात यश मिळविलेल्या आणि महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली आलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सिताराम गायकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक भांगरे यांची मंगळवारी सर्वानूमते निवड करण्यात आली. भाजप नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड पितापुत्राच्या अधिपत्याखाली असलेल्या व नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने पिचड यांच्या पॅनेलचा सपशेल धुव्वा उडविला. कारखान्यावर गेली २८ वर्षे निरंकुश सत्ता भोगणाऱ्या पितापुत्रांना कारखान्याच्या या निवडणुकीत चंचुप्रवेश देखील करता आला नाही. पिचड पिता-पुत्रांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. कारखान्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य असणाऱ्या व सुमारे ५० देशांमध्ये तीन लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या कॅपजेमिनी या कंपनीत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील १११ विद्यार्थ्यांची चांगल्या पगारावर थेट निवड झाली. अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. डॉ. व्यंकटेश म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे राज्यातील अग्रमानांकित महाविद्यालय ठरले आहे. नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा मिळवणाऱ्या या महाविद्यालयामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या थेट मुलाखती आयोजित करत असतात. कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला अमृतवाहिनीतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या चाणक्य मंडळ परिवाराच्या संचालिका रोहिणीताई गुट्टे-नागणे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे व्यासपिठावर उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. व्ही-स्कुलमध्ये योगदान देऊन पंचायत समितीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची सोमवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी स्वत:ला सावरत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ८१ वर्षीय पिचड सकाळी सातच्या सुमारात फेरफटका मारत असतांना अचानक त्यांचा रक्तदाब अनियमीत झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने त्यांची डॉ. मारुती भांडकोळी आणि डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्याकडून तपासणी करुन घेतली. मात्र त्यांनी पिचड यांना तातडीने लिलावतीत हलविण्याचा सल्ला दिला. पिचड यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजुर येथील निवासस्थानी धाव घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पिचड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच कचरा मुक्त शहराअंतर्गत थ्री स्टारचे मानांकन देखील पालिकेत प्राप्त झाल्याची माहिती प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ दिली. 2022 मध्ये झालेल्या या स्पर्धेचे मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले असून संगमनेर नगर परिषदेने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात मोठी मेहनत घेत संगमनेर कचरा मुक्त करण्यात आणि या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पालिकेला कोट्यावधी रुपये बक्षीस मिळून देण्याचे काम केले होते. आता प्रशासकीय कालावधीत देखील हाच पायंडा कायम राहिला आहे. केंद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अविनाश वाघमारे याला लोणावळा पोलीसांनी अटक केली आहे. वाघमारे याने खोडसाळपणा करत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या कथित हत्येच्या धमकी प्रकरणाचा उलगडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती थेट पोलिसांच्या १०० नंबरवर देण्यात आली होती. सतर्क झालेल्या पोलिसांनी घाटकोपरमधील रहीवासी असलेल्या अविनाश वाघमारे याला ताब्यात घेतले. वाघमारे मुंबईहून सांगलीला जात असतांना लोणावळ्यात शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. १०० नंबरवरील या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांनी या कथित प्रकरणाच्या तळाशी…

Read More