Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राहाता : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी कोंबड्याच्या जाळीमध्ये शिरलेल्या बिबट्याने कोंबड्यांसोबतच शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे समोर आला आहे. जखमी शेतकऱ्यावर शिर्डीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे. बबन बाजीराव ढगे (वय ६५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ढगे नेहमीप्रमाणे झोपलेले होते. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या जाळीतील कोंबड्या जास्त आवाज करू लागल्याने त्यांनी कोंबड्यांच्या जाळीकडे धाव घेतली. जाळी जवळ गेल्यानंतर त्यांना कोंबड्यांच्या जाळीमध्ये बिबट्या शिरला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने जाळीचा दरवाजा उघडला. मात्र बिबट्याने लगेचच त्यांच्यावर हल्ला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे / अहमदनगर : आठवडाभराच्या अंतरात दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सात मृतदेह आढळून आढळून आल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. प्राथमिक तपासात सामूहिक आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने आपला तपास देखील सुरूच ठेवला होता. आता मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या सातही जणांची आत्महत्या नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबातील नातेवाईकांनीच हे भीषण कृत्य केले असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात टप्प्याटप्प्याने आठवडाभरात तीन बालकांसह सात जणांचे मृतदेह आढळले होते. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या निघोजमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाला असून या अन्यायामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. साळुंखे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे राजकीय वर्तुळात या राजीनाम्याबद्दल चर्चा सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण तांबे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाकडून साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोना साथ रोगामध्ये एसटी महामंडळाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक ठिकाणच्या बस सेवा बंद केल्या आहेत. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी, अद्यापही एसटी महामंडळाने या सेवा पूर्ववत केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार आंदोलने करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आता थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या छात्रभारती संघटनेने दिला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने आगार व्यवस्थापकांना वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली, सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी महामंडळाकडून वारंवार उडवा उडवीची उत्तरे दिली. गेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदव्युत्तर परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिली जाणारी तीन सुवर्णपदके एकाचवेळी मिळवत संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल सानप याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सानप याच्या यशामुळे संगमनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे कै. प्रमिला दत्तात्रय आलेगावकर सुवर्णपदक, जेष्ठ समीक्षक म. ना. अदवंत स्मृती सुवर्णपदक आणि नामदेव श्रीपती रानवडे स्मृती सुवर्णपदक एकाच वेळी सानप या विद्यार्थ्याने मिळविले आहे. सानप संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी असून महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रामध्ये प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / दौंड : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये तीन लहान मुलांसह सात जणांचे मृतदेह सापडले आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह नदीत आढळल्याने पुणे आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आयुष्य संपविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. मंगळवारी भीमा नदी पात्रात तीन लहान मुलांचे मृतदेह आढळले. तत्पूर्वी नदीपात्रात चार मृतदेह आढळले होते. एकाच वेळी सात मृतदेह आढळून आल्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली होती. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. मोहन उत्तम पवार (वय-४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म गद्दारी करत खिशात घातला. आधी त्यांनी काँग्रेसला मामा बनविले, आता ते मतांसाठी सुशिक्षित पदवीधरांना मामा बनवत आहे. त्यांच्या रक्तात, श्वासात काँग्रेस नसून फक्त सत्ता असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आणि मेळावा झाला. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पदवीधर मतदारांच्या संवाद कार्यक्रमात काळे यांनी तांबे यांच्यावर टीका केली. पदवीधरांशी झालेल्या संवादानंतर जिल्ह्यात प्रचाराचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सासू आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळात संगमनेर तालुक्यातील खांबे येथील एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासूच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. काजल मच्छिंद्र वाघ असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिचा विवाह संगमनेर तालुक्यातील खांबे येथील मच्छिंद्र बाळासाहेब वाघ यांच्याबरोबर 13 मार्च 2018 रोजी झाला होता. विवाह नंतरचे सुरुवातीचे चार-पाच महिने उभयंतांचा संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. नंतर मात्र त्यांच्यात कौटुंबिक कलह सुरू झाले. लग्न संबंधातून या दांपत्याला मुलगी झाली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीने दहा शाळांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती एस. जी. फटांगरे होत्या. जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रामदास राहणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सह सेक्रेटरी अशोकराव राहाणे, देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश पावसे, सुभाष गडाख, सुजाता दवंगे, बजरंग पावसे, किरण पावसे, हरीश गडाख आदि यावेळी उपस्थित होते. स्थायी विकास संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या खेळाच्या साहित्यामध्ये क्रिकेट किट, झांज, ढोल, लेझीम, बॅडमिंटन किट, हॉलीबॉल किट, कॅरम बोर्ड अशा 19…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी देवेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर चर्चेत आलेल्या धीरेंद्र महाराजांबद्दल प्रसिद्ध लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार हे नाव सध्या देशभरात प्रसिद्ध झाल आहे. चर्चेत आलेले बागेश्वर महाराज लोकांच्या मनात काय चाललंय, हे अचूक ओळखतात. असा दावा केला जातोय. या बागेश्वर सरकारांच्या दरबारात एकदा हजेरी लावली तर नशीब पालटत अशी श्रद्धा सध्या लोकांच्या मनात आहे. हे महाराज लोकांच्या समस्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणतात. तसेच एका कागदावर त्या व्यक्तीला भेडसावत असलेल्या समस्येचे उत्तर लिहून देतात, अशी धारणा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोलकत्ता : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पत्नी हसीन जहाँला दरमहा एक लाख तीस हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश कोलकत्ता न्यायालयाने दिले आहेत. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने २०१८ मध्ये न्यायालयात केस दाखल करत पती मोहम्मद शमी यांच्याकडून स्वतःसाठी व मुलीच्या देखभालीसाठी पोटगीची मागणी केली होती. दरम्यान, मोहम्मद शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये जास्त होते. त्यानुसार दरमहा दहा लाख रुपये पोटगीची मागणी करण्यात आली, अशी माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. याप्रकरणी मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अल्पवयीन भाचीला आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेणाऱ्या मामाची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश यो. प्र. मनाठकर यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निवाडा केला. संगमनेर शहरातील पंधरा वर्षीय मुलीस तिच्या मामाने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची आणि त्यासाठी आणखी एका आरोपीने मदत केल्याची तक्रार मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १६ मे २०१९ रोजी केली होती. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा विष्णू दिवे आणि किरण शिंदे या दोघांविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, लग्नाचे अमिष दाखविणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. शहर पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेरमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने सोमवारी सकाळी बसस्थानक चौकात शिवसेनाप्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात ठाकरे यांची मोठे प्रतिमा लावण्यात आली होती. शिवसेनेमध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख रमेश काळे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शिवसेनेची अस्मिता असलेल्या हिंदू हृदय सम्राट, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. बस स्थानक चौकात झालेल्या या अभिवादन सभेसाठी शिवसैनिकांसह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हास्तरीय नेते मुजीब शेख, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, संगीता गायकवाड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे कर्मवीर होते. त्यांनी हजारो कामगारांचे नेतृत्व केले. संघर्षाऐवजी समन्वयाच्या भूमिकेवर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळेच कामगारांच्या परिवारांनाही उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा दाखवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांनी केले. दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, महाराष्ट्र राज्य विडी कामगार सभेचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, कॉ. ज्ञानदेव सहाणे, कामगार नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे : आज माध्यमांमध्ये हिंसक बातम्यांना मोठ्या प्रमाणात स्थान मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये नकारात्मकता वाढविणाऱ्या अनेक घटना समोर येत आहे. अशा स्थितीत प्राण वाचविणाऱ्या बातम्यांना माध्यमांमध्ये स्थान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत अशावेळी लेखकांनी साहित्यामधून सकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी माहिती आयुक्त व जेष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी केले. चपराक प्रकाशनच्यावतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कुवळेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश सुनील वेदपाठक, पुस्तक प्रकाशन घनश्याम पाटील, पत्रकार निसार शेख, संदीप वाकचौरे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, मनोहर इनामदार, चंद्रलेखा बेलसरे आदी उपस्थित होते. कुवळेकर म्हणाले, हल्ली चांगल्या गोष्टी खऱ्या आहेत याबद्दल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : व्याजाचे पैसे मागितल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीची परिणती खुनामध्ये झाली होती. खुनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तसेच तुरुंगात असलेल्या आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी दिले आहे. तुकाराम बुधा उघडे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले याने गावातील कैलास यशवंत घोडके याला नऊ ते दहा वर्षांपूर्वी व्याजाने दहा हजार रुपये दिले होते. घोडके याने ही रक्कम उघडे यांना परत केली होती. मात्र त्यावरील व्याज दिलेले नव्हते, त्यामुळे तुकाराम उघडे हे घोडके यांच्याकडे व्याजाची मागणी करत असत. १ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकास पुरस्कार पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते थोरात कारखान्यास प्रदान करण्यात आला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मापदंड ठरला आहे. कारखाना आतापर्यंत अनेकदा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्काराने गौरविला गेला आहे. मांजरी (पुणे) येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फेडरेशन ऑफ को ओपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यावतीने…
प्रवीण पुरो 🔹 रविवार विशेष विरोधी पक्षांची कोंडी करण्याचे नीच धंदे अजूनही भाजपच्या कंपूने थांबवलेले नाहीत. या आधी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी वापरले जात होते. आता ते शिवसेनेची कोंडी करण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत. देशात सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराचं निमित्त करत तक्रारखोर किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत इडीने आपलं काम सुरू केलं आहे. मुंबई महानगरपालिका आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना आरोपीच्या पिंजर्यात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड काळात चांगलं काम केल्याचं बक्षिस भाजपने सुरू केलं आहे. आपण नाही केलं ते इतरांनीही करू नये, असंच भाजपच्या नेत्यांना सांगायचं असावं. ज्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणावरून राग अनावर झालेल्या गावातील सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यानंतर उर्वरित आरोपींनी साठी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी बंद केलेल्या पाणीपुरवठा संदर्भात प्रश्न विचारला होता. इघे यांनी ग्रामसभेत विचारलेला प्रश्न सत्ताधाऱ्यांना रुचला नाही त्यामुळे त्यांनी त्याला ग्रामसभेतच धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर इघे आपल्या मित्रासोबत साकुर कडे जात असताना जवळच्या घाटामध्ये पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने त्यांना गाठत…
