Author: Annant Ppangarkar

(महाराष्ट्र संवाद न्यूज च्या वाचकांसाठी दैनिक सामना मधील बातमी सोबत देत आहोत) महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्याबाबत काही समाजकंटकांनी अश्लाघ्य वर्तन केले आहे. असे वर्तन करणाऱ्या समाजकंटकांचा शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काहीही संबंध नाही. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयातून सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या नियुक्ती यांना ब्रेक लागला असून आता शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवे पदाधिकारी कधी जाहीर होतात, याची शिवसैनिकात उत्सुकता आहे. शिवसेना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमधून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा नदीमध्ये मोठ्या पुलाजवळ काही अंतरावर शुक्रवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.शुक्रवारी सकाळी प्रवरा नदीपात्रातील मोठ्या पुलाखाली आणि तेथून काही अंतरावर असलेल्या फादरवाडी जवळ नदीपात्रात दोन पुरुषांचा मृतदेह आढळून आला शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून काढत शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या विच्छेदन गृहामध्ये आणले होते.दरम्यान दोन मृतदेंपैकी एकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून हा मृतदेह शहरातीलच मोगलपुरा पुणे नाका येथील अमोल अण्णासाहेब आव्हाड याचा असल्याचे स्पष्ट झाले आव्हाड बेपत्ता झाल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. अशावेळी राज्य सरकार महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचे सांगत आहे. तुम्ही भरती करणार असाल तर किती प्रकल्प राज्यात येणार आहे. आणि किती भरती करणार आहात. याची माहिती राज्याला द्या, असे जाहीर आव्हान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या शिबिराला शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. तत्पूर्वी पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, “आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना आम्ही…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर नजीकच्या हिवरगांव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामूळे आत्तापर्यत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली आरपारच्या लढाईच्या इशारा देत शुक्रवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे.टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल…

Read More

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आईवडीलांच्या कुशीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याला त्यांच्या कुशीतून ओढत त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. चिमुरड्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्यामुळे जाग्या झालेल्या आईवडीलांनी बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्याला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. विरु अजय पवार असे या चिमुरड्याचे नांव आहे. सध्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु आहे. यासाठी संगमनेर तालुक्यात काही ऊसतोडणी कामगार आले आहेत. थोरात कारखान्याच्या ऊसतोडणीशी संबधीत असलेले २० मजुरांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीतील एका अधिवेशननंतर सरकार पडले होते आता आमच्या अधिवेशनानंतर देखील शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे असे आम्ही स्नेही खासदार सुजय विखे पाटील यांना शिर्डीत जाऊन सांगणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व पाच नोव्हेंबर रोजी ‘राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा’ हे शिबिर होत आहे. या राज्यव्यापी शिबिरासाठी आजी-माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पत्र वाघ यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे यामुळे त्या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे मानले जाते. याआधी महिला प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे काम पाहत होत्या मात्र त्या विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर या जागेवर आता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले असून याद्वारे भविष्यात राज्यात अगणित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत ७५ हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यावेळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. काही प्रकल्प लवकरच सुरू होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली आणि पंतप्रधानांचे होमपीच असलेली गुजरातची निवडणूक अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. १८२ जागांसाठी दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल हिमाचल प्रदेश सोबत म्हणजेच ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर केल्या आहेत. एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होत असून हिमाचल आणि गुजरातची मतमोजणी एकाच दिवशी ८ डिसेंबरला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संस्थेच्या इमारतीच्या वॉटर प्रूफिंग आणि कोबा करण्याच्या नियोजित कामात ठेकेदाराकडून तीस हजार रुपयांचे लाच घेताना आयटीआयच्या प्राचार्याला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलगदपणे सापळ्यात पकडले आहे. नासिकरोड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेला निलेश बबन ठाकूर हा सिन्नरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) प्राचार्य आणि सचिव आहे. एसीबीच्या माहितीनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग आणि कोबा करण्याचे काम नियोजित होते. ११ लाख ५१ हजार रुपयांना या कामाचा ठेका एका कंत्राटदाराला देण्यात आला होता. या कंत्राटदाराकडे प्राचार्य ठाकूर याने तीन टक्के रक्कम लाच म्हणून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारास, “भारत माता ही विधवा नाही त्यामुळे तू आधी कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलतो”, अशा शब्दात महिला पत्रकाराशी वादग्रस्त विधान करत संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा महिला पत्रकाराशी बोलताना केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात आले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटी संदर्भात संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी बोलण्याकरता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. शेतकरी आणि कारखाना प्रश्नांवर अनेकदा न्यायालयात धाव घेतली मात्र आता न्यायव्यवस्था, सरकारवर विश्वास राहिलेला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले. शेट्टी यांच्या उपस्थितीत मांडवे खुर्द येथे झालेल्या ऊस परिषद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, उद्योजक किरण वाबळे, प्रगतशील शेतकरी कारभारी आहेर, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शेतकरी नेते जगदीश गागरे, अशोक खेमनर, प्रा. जालिंदर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिकहुन पुण्याला जाणारी शिवशाही बस सिन्नरहून संगमनेरच्या दिशेने येत असताना माळवाडी शिवारात या बसने पेट घेतला. बसला लागलेल्या आगीमध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली असून केवळ नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शिवशाही बसने सकाळी सात वाजता नाशिक सोडल्यानंतर ती प्रवासी घेऊन सिन्नर स्थानकात आली होती. तेथून बस संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर माळवाडी शिवारामध्ये अचानकपणे धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि शिवशाही बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच शिवशाही बसने पेट घेतला आणि आगीच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत लढणार असल्याने आरपीआयला सत्तेत चांगला वाटा मिळायला हवा. यासाठी राज्यपाल नियुक्त बारापैकी एक जागा आरपीआयला देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात त्यांच्यात यावेळी चर्चा झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) भाजपसोबत ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2012 पासून आरपीआय भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही तुम्हाला सत्तेमध्ये नक्कीच चांगला वाटा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय, पण यापुढे कोणीही असला तरी प्रहारचा वार काय आहे हे दाखवून देऊ. सत्ता गेली चुलीत. अशा थेट शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. 50 खोक्यांच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमरावतीमध्ये आज भूमिका जाहीर केली. आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना आमदार कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा दिला. मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, सत्ता गेली चुलीत गेल्या वीस वर्षांपासून साडेतीनशे गुन्हे अंगावर घेऊन महाराष्ट्रात फिरतोय. बाकीचे नेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असलेले संगमनेरचे भूमिपुत्र डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याचे धमकी मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉक्टर देठे यांना मिळालेल्या धमकी पत्रामध्ये म्हटले आहे की, जय लाल सलाम, जय किसान डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी… एकनाथ शिंदे का ऑफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो. जय नक्षलवाद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरात बिजनेस कोच म्हणून प्रसिद्ध असलेले विनीत बनसोडे आता संगमनेर मधील उद्योजकांना शनिवारी (५ नोव्हेंबर) उद्योग वृद्धीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या संगमनेर शाखेचा सेक्रेटरी डॉ. सागर गोपाळे यांनी दिली. नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील हॉटेल मयूर एक्सप्रेसमध्ये शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विनीत बनसोडे हे बिजनेस कोच म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सेक्रेटरी जनरल या पदावर ते कार्यरत आहेत. प्रसिद्ध बिझनेस कोच संतोष नायर यांचे ते गुरु आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही उद्योजकांसाठीची संघटना वीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिकांसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात ७५…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे निर्माण झालेली राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता तब्बल चार आठवडे म्हणजेच महिना अखेरपर्यंत लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने २९ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी सुनावणी सुरू झाली. सुनावणी मध्ये घटनापिठाने दोन्ही बाजूच्या पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांना लिखित स्वरुपात न्यायालयासमोर कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. यानंतर मात्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सलगपणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल देसाई यांनी सांगितले की, सुनावणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) नाव काढलं की भल्या भल्या राजकारणांना घाम फुटतो. मात्र आता एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. अनेकांना घाम फोडणाऱ्या या ईडीच्याच एका अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड ईडी अधिकाऱ्याला आपल्या पगारातून भरावा लागणार आहे. 24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या कॅन्सरग्रस्त बँक कर्मचारी असलेल्या आरोपीला हायकोर्टाने जामीन दिला होता, मात्र तरीही ईडीनं याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ईडीला तर फटकारले. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. तसेच कॅन्सरग्रस्त आरोपीचा जामीन कायम ठेवला. लीगल शुल्क, स्टेशनरी सोबतच कोर्टाचा वेळही वाया घालवला, असे…

Read More