Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी:  गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. २४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले. यावेळी बोलताना डॉ. जयश्री…

Read More

मुंबई:  नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात मे आणि जून महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची चांगली उपलब्धता आहे, यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आणि माजी जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून आपल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे की, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या…

Read More

संगमनेर, ०९ जुलै २०२५-प्रतिनिधी:  संगमनेर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ लहान वासरे ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे डॉ. सोनवणे यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल…

Read More

अहिल्यानगर:  अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या १५९ व्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांतील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. १९७० मध्ये…

Read More

मुंबई:  सध्या राज्यात मराठी-अमराठी वादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कडक आदेश जारी केले आहेत. यापुढे कोणीही त्यांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने स्वतःचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत किंवा व्यक्तिगत प्रतिक्रिया देऊ नयेत. महत्त्वाचे म्हणजे, पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषेच्या…

Read More

संगमनेर, ०९ जुलै २०२५- प्रतिनिधी:  संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचे गोमांस आणि हत्यारं जप्त करण्यात आली असून, तिघे आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने, या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या अनुषंगाने माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रवरा, आढळा आणि म्हाळुंगी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अमृतवाहिनी प्रवरा नदीला आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पूजन करत आरती केली. प्रवरानदीच्या गंगामाई घाटावर हा सोहळा पार पडला. यावेळी प्रवरा नदीचे विधिवत जलपूजन आणि आरती करण्यात आली, तर म्हाळुंगी नदीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, अजित काकडे, प्रमिला अभंग, ॲड. मुन्ना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करत उच्चांकी भाव दिला आहे. आता महाराष्ट्रात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने, कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात ऊस वाढ कार्यक्रमांतर्गत नवीन AI वापरासाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीबद्दल अधिक माहिती देताना घुले म्हणाले की, जागतिक स्तरावर शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. ऊस शेतीमध्ये बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत कनोली येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतुकीसाठी ३० हजार रुपयांची मागणी या तलाठ्याने केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये घेताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांचे मित्र शासनाच्या धोरणानुसार मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू वाहतुकीचं काम करत होते. संगमनेरचे तहसीलदार यांनी या कामासाठी त्यांना मंजुरी दिली होती. मात्र, तलाठी संतोष शेलार यांनी या कामासाठी ३०…

Read More

मुंबई: राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.  संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई:  मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच ठाणे-पालघरचे मनसे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेने या मोर्चाचे आयोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असून, अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम होती. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर मराठी बांधवांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता…

Read More

मुंबई, 7 जुलै 2025: महाराष्ट्रात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिक जिल्ह्यातील ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आणि गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येची उदाहरणे देत तांबे यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली. आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला होता. त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षणाबाबत कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोमवारी दुपारी १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार अमोल खताळ यांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत असल्याने, धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी, धांदरफळ, मंगळापूर, खांडगाव, कासारा दुमाला, संगमनेर खुर्द, निंबाळे, रायते, वाघापूर, खराडी, पिंपरणे, जोर्वे, रहिमपूर, कनोली आणि ओझर बंधारा परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आमदार खताळ यांनी आवाहन केले आहे की, नदीपात्रात असलेले जनावरे, पाण्याचे पंप, शेती…

Read More

अहिल्यानगर / अकोले, दि. ७ –  निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज (सोमवार, दि. ७ जुलै) सकाळी ९ वाजता ६५७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: महायुती सरकारने सुरू केलेल्या घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही योजनेसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन करत, पैसे घेऊन लाभार्थींची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आमदार खताळ यांनी दिला. महायुती सरकारने घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील लाभार्थी महिलांना आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, पायल ताजणे, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, रेखा गलांडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज- पंढरपूर:  आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. पहाटे ३ वाजता ही महापूजा पार पडली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा देखील उपस्थित होत्या. महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह आणि नाशिक येथील मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि दुग्धाभिषेक केला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या वर्षी नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास…

Read More