Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरात वर्दळीचा भाग असलेल्या पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात प्रस्तावित ट्रक टर्मिनसच्या कामावरून सध्या राजकारण तापले आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने गुंजाळ मळ्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधी या कामाची सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, असा थेट सवाल करत नागरिकांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे, असे म्हटले आहे. स्थानिक नागरिक शुभम गुंजाळ आणि राहुल गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, या ट्रक टर्मिनसचे काम मार्च २०२४ मध्ये नगरपरिषदेने निविदा प्रसिद्ध करून सुरू केले आहे. हे काम ‘भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजने’…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज असून त्याचा प्रत्येक समाज बांधवाला अभिमान आहे. येथील समाज बांधवांचे ऐक्य पाहून आनंद झाल्याचे प्रतिपादन ‘लय आवडतेस तू मला’ फेम अभिनेते तन्मय जक्का यांनी केले. अभिनेते तन्मय जक्का आणि एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी यांच्या उपस्थितीत रविवारी (२२ जून) मालपाणी उत्सव हॉल येथे संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक व विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि संगमनेरच्या विवाहित महिलांचा (लाडक्या लेकी) गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शहरातील प्रवरा नदीकाठी असलेल्या श्री साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई सच्चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत हा सामुदायिक अखंड पारायण सोहळा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे पारायण आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक संकल्पाने होईल. या पारायणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भाविकांना संकल्प सोडण्यासाठी श्री साई मंदिराच्या पारायण हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा आठ दिवस चालेल. भाविक आपल्या सोयीनुसार पहाटे ५:३० ते रात्री १० या वेळेत श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे वाचन करू शकतात. पारायणाची सांगता १० जुलै रोजी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभार आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ गुरुवारी (२६ जून) आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या आंदोलनांची दखल न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट पंचायत समितीवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. एका महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतीवर पालकमंत्री विखे यांच्या गटाची सत्ता आहे. या काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी कागदोपत्री दाखवण्यात आली आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात आलेल्याच नाहीत. गावातील…

Read More

अहिल्यानगर, २६ जून:  जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आणि बेकायदेशीर गर्भपातांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशेष पथके तयार करून ही तपासणी केली जाणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया यांनी बैठकीत सांगितले की, जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात केंद्रे यांची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी महायुती कटिबद्ध असून आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला जनतेने साथ दिल्यास शहराच्या विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आमदार खताळ यांनी नुकतीच संगमनेर नगरपरिषदेमार्फत पंचायत समितीजवळ सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत ते काम चार-पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ट्रकचालक आणि क्लिनर यांच्यासाठी टर्मिनलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. खताळ म्हणाले की, संगमनेर शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

अहिल्यानगर, दि. २६:  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या आढावा बैठकीत समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनावर आणि विशेषतः अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या पशुधनाला गोशाळांकडून प्रवेश नाकारल्याच्या तक्रारींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर आणि उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी गोशाळा संचालकांना सक्त निर्देश दिले. ते म्हणाले की, अनाथ किंवा अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या गायवर्गीय पशुधनाला गोशाळांमध्ये दाखल करून घेण्यास…

Read More

अहिल्यानगर:  छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत एका खाजगी एजंटसह एका मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराकडून ओव्हरलोड कारवाई टाळण्यासाठी १८,००० रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. ३३ वर्षीय तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन असून, ते जालना ते मुंबई तुरीची डाळ आणि इतर कडधान्याची वाहतूक करतात. त्यांचे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून विनाअडथळा चालू देण्यासाठी आणि त्यांच्या वाहनावर ओव्हरलोडची कारवाई न करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथील खाजगी एजंट संदीप रामदास ढोले (वय ४२) यांनी २०,०००…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  चित्रपटातील एखाद्या नायक-नायिकेला लाजवेल अशा थाटात कॅमेऱ्याला पोज देणाऱ्या एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दूध संस्थेच्या शेजारील शेतात ही थरारक घटना घडली, जिथे बिबट्या चक्क बगळ्यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता. बुधवारी (२५ जून) सायंकाळच्या सुमारास, आश्वी खुर्द येथील तरुण शेतकरी अभिषेक भवर हे आपल्या ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होते. नांगरलेल्या शेतात बगळे किटकांना टिपत असताना, जवळच असलेल्या उसाच्या शेतात एक बिबट्या बगळ्यांची शिकार करण्याच्या तयारीत दबा धरून बसला होता. ट्रॅक्टर आणि उसाच्या शेतीतील अंतर केवळ पाच फुटांचे असतानाही, बिबट्याने अत्यंत शांतपणे दबा धरून…

Read More

बुधवार, दि. २५ जून – अहिल्यानगर  अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करून खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आणि आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात आरोपीने चाकूहल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी: रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर अतिक्रमण करून विनापरवाना संरक्षक भिंत आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याच्या उप अभियंत्यांनी चंदनापुरी (संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना एका नोटीसद्वारे चांगलाच दणका देत सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश बजावले आहे. शाळेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अतिक्रमणाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या रस्त्यावर ४/४०० ते ५/४०० किलोमीटर दरम्यान झालेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना ही नोटीस बजावली असून, नोटीसच्या माध्यमातून ही अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २, अकोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार, चंदनापुरी जिल्हा परिषद प्राथमिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असल्याचे व नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम असल्यामुळे हे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या नवीन मिनी रेस्क्यू अग्निशमन (गुरखा) वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते पार पडला.  यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जाहागीरदार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासातून दोघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. या घटनेमुळे दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि महाविद्यालयीन तरुणी रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी असून पारधी हे अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटींच्या अपहाराचा फटका बसलेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे पैसे परत मिळावेत यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दूधगंगा ठेवीदार संघर्ष समितीने स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला असून, यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह (ACB) प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. भाऊसाहेब कुटे याच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी… संघर्ष समितीच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पाठवलेल्या निवेदनात, ३२ वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मालमत्तेची कसून चौकशी करून ती जप्त करावी आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे, अशी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श तत्त्वज्ञान आणि विचार देणारे स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अमूल्य योगदान आणि त्यांच्या कार्याचा, तसेच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली देशासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील सहकाराचा समावेश आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. येथील सहकार चळवळीचे महती आणि दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही बाब संगमनेरच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान ठरली आहे. येथील सहकाराचा अभ्यासक्रमात समावेश संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची माहिती संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आता संगमनेरमधील सहकाराचे हे महत्त्वपूर्ण पैलू अभ्यासता येणार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या कथित विधानांवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वादात आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी उडी घेतली असून, त्यांनी अबू आझमींना थेट इशारा देत वारी ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे ठणकावून सांगितले आहे. आ. खताळ यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक सविस्तर ट्विट करत आझमी यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. https://x.com/amolkhatalpatil/status/1937066759900839949?t=r1JBwjRagfUHXyT3UM6lFg&s=19 आ. खताळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पावसाची सर झेलत, पायी चालत असतात.” वारीमधील शिस्तीचे दाखले देत त्यांनी लिहिले की, “ट्रॅफिक जॅम…

Read More

संगमनेर, २३ जून – प्रतिनिधी:  अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर, संगमनेर शहर पोलिसांनी प्रवरा नदीकिनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सुरु असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५,११,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांची चर्चा सुरू होती. विशेषतः, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील दोन मोठ्या मटका चालकांवर कारवाई केली होती. असे असतानाही, शहरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…

Read More

अकोले, २३ जून- प्रतिनिधी समाजासाठी दिशादर्शक ठरणारी मदत ही एक उत्कट आणि आध्यात्मिक समाधान देणारी बाब आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालय, सहसचिव विजय चौधरी यांनी केले.  रविवारी (दि. २२) अकोले येथील अगस्ती मंदिरात आयोजित गुरुकुलच्या ५४ हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसनशेठ लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक, राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज-  १२ वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. साधना धोंडिराम भोसले असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले धोंडिराम भोसले यांची मुलगी साधना १० वी मध्ये ९२.६०% गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. तिला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिची खासगी शिकवणी सुरू होती. नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडील धोंडिराम चिडले होते. शुक्रवारी रात्री (२१ जून) धोंडिराम यांनी साधनाला कमी गुणांबद्दल विचारणा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज-  गृहपाठाच्या बहाण्याने एका ८ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (२० जून) सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यावर रडू लागली. आईने विचारणा केली असता, गणिताच्या तासाला शिक्षकाने स्वाध्याय आणि गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी (२१ जून) आरोपी शिक्षकाला…

Read More