Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने राजेंद्र गायकवाड हे घरीच होते. त्यांची पत्नी दौंड येथे गेली होती, तर १२ आणि १४ वर्षांची त्यांची दोन्ही मुले शाळेत होती. दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना अनेक वेळा फोन केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. शाळा सुटल्यावर मुले घरी परतली असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला.…
शिर्डी – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांना शिर्डीतील या अध्यात्मिक सोहळ्यासाठी आमंत्रित केले. या शिवकथा महोत्सवाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंबियांनी स्वीकारली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी आणि अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींकडून शिवकथेसारखा अध्यात्मिक सोहळा आयोजित करण्याची सातत्याने विनंती केली जात होती. या भक्तीभावाला प्रतिसाद देत डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा पुढाकार घेतला…
राज्य विधानमंडळ इतकं खाली गेलंय, हे ऐकून मन विचलित होतं. 1978 पासून या सभागृहांशी संबंधित असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकली की वाईट वाटतं. इतकासा आवाज चढला तरी पीठासनावरील अधिकार्याची भीती वाटायची. मारामारी हा तर विषयच नसायचा. अगदीच नाराजी व्यक्त करण्यासाठी विरोधकांकडून आयुधांचा वापर व्हायचा. पण त्यासाठी हातघाईवर यायची आवश्यकता पडत नसे. एकेका सदस्याचा मान इतका तोडीचा असायचा की पीठासनावरील अधिकारीच त्याची काळजी घेत. महाराष्ट्राचं हीत हेच या सगळ्यांचं ध्येय असायचं. सभागृहातल्या उच्चकोटीच्या चर्चा ही तर दोन्ही सभागृहातील पर्वणीच. असे असंख्य प्रकरणं सांगता येतील, ज्यात उशिरापर्यंत सदस्य सभागृहात थांबायचे. चिंता महाराष्ट्राची असायची. आता ते राहिलं…
संगमनेर, प्रतिनिधी: सध्याच्या तरुण पिढीने मोबाईलवरील ‘रील’ बनण्याऐवजी जीवनात ‘रियल’ आदर्श निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. छत्रपती प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. कांगणे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानण्याचे आवाहन तरुणांना केले. ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर जागरूकतेसाठी करावा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नये. दुर्दैवाने आजच्या पिढीचे आदर्श बदलत असून, तरुणांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी. क्षणिक प्रसिद्धीच्या मागे न लागता कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवन बदलता येते, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर, दि. १९: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी तथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी येवती (ता. श्रीगोंदा) येथील एका वृद्ध दांपत्याला त्यांची सुनेने बळकावलेली वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे तहसीलदारांना ही जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येवती येथील ज्ञानदेव दिनकर आढाव आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई आढाव या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे, विजय आढाव यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सून,…
संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ, वाढती गुंडगिरी आणि विधानसभेतील राड्याच्या घटनांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राज्यातील दहशतवाद आणि गुंडगिरी भाजप पुरस्कृत असल्याचा घणाघाती आरोप करत, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते ‘फंडे’ वापरले, पक्ष कसे फोडले आणि कसे चुकीचे निकाल दिले, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत असल्याचं थोरात यांनी नमूद केलं. ते म्हणाले, आज महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात आहे. यामुळे राज्यात दहशत आणि गुंडगिरी…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र, वीर जवान संदीप किसन घोडेकर यांना देशसेवेत कर्तव्य बजावताना मरण आले. त्यांच्या निधनाबद्दल माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, घोडेकर यांच्या देशसेवेतील योगदानाला संगमनेरकर सदैव स्मरणात ठेवतील, असे प्रतिपादन केले. शुक्रवारी (१८ जुलै) बाळासाहेब थोरात यांनी घोडेकर मळा येथे शहीद संदीप घोडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वीरपत्नी वर्षा संदीप घोडेकर आणि मुलगा यश संदीप घोडेकर यांचे तसेच संपूर्ण कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी थोरात म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन संदीप यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारले होते. सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात, तर…
संगमनेर, प्रतिनिधी: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वपक्षीय नागरिकांनी शुक्रवारी एकत्र येऊन तीव्र निषेध केला. हा हल्ला करणारा ‘काटे’ केवळ एक मुखवटा असून, त्यामागील खरे सूत्रधार शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध सभेत छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन विकास मंच, गाथा परिवार यांसारख्या पुरोगामी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आदी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुरेसा समावेश नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांनी यावर लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. आमदार तांबे यांनी भाषणाची सुरुवात करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रयत्नांसाठी शालेय शिक्षण विभाग आणि मंत्र्यांचे अभिनंदन केले. मात्र, यासोबतच त्यांनी एक महत्त्वपूर्ण चिंता व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये या वर्षापासून सीबीएसईच्या धर्तीवर एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो एक स्तुत्य…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या शिपायाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण शंकर वेडे (वय 33, रा. साळीवाडा, रंगारगल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 (1), 115, 352, 3(5) नुसार गुन्हा क्र. 655/2025 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीच्या मोटरसायकलला कट मारून धडक दिली आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने शिवीगाळ न करण्यास सांगितल्यावर, आरोपीने त्यांच्या तोंडात हाताने चापटी मारली. तसेच, डोळ्यावर आणि छातीवर हाताने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: घर भाडेकरू असलेल्या महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून सोन्याचे गंठण व मोबाईल काढून घेतल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तलाठी मच्छिंद्र राहणे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आरोपीच्या पत्नीचा जामीन अर्ज संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे. तक्रारदार महिला अनिता राहाणे यांच्या घरात भाड्याने राहत असताना, मच्छिंद्र राहाणे रात्री अपरात्री त्रास देत असे आणि लज्जास्पद संदेश पाठवत असे, असा आरोप आहे. १ जुलै २०२५ रोजी दुपारी, अनिता राहाणे आणि अन्य ८-९ महिलांनी फिर्यादीला घराबाहेर ओढून मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील २७,००० रुपयांचे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील गटार दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालेल्या अतुल रतन पवार याच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून तातडीने १० लाख रुपयांची मदत मिळाली आहे. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा धनादेश पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. १० जुलै २०२५ रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराचे काम सुरू असताना गटार साफ करताना अतुल पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देण्याचे लेखी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रजेवर बाहेर आल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला होता. २०१४ मध्ये बीड येथे ही धक्कादायक घटना घडली होती. विठ्ठलला त्याच्या बहिणीचे प्रेमप्रकरण आणि प्रियकरासोबतचे लग्न मान्य नव्हते. यातून त्याने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयातच विष पाजून प्राणघातक हल्ला केला होता. दुर्दैवाने या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर बचावला. या गुन्ह्यासाठी विठ्ठलला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, १७ जुलै: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांचा आढावा घेतला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिर्डी विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे सध्या संथगतीने सुरू असून, ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त…
संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सहकारी संकल्पना ही जागतिक स्तरावर नावाजली जात असून, सहकारातूनच सामान्य माणसाची खरी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी केले. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार दिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सहकार दिंडी व सहकार परिसंवादात बारी बोलत होते. राजहंस दूध संघापासून सुरू झालेली ही दिंडी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून अमृतवाहिनी बँकेपर्यंत काढण्यात आली. “विना सहकार, नाही उद्धार” या घोषणांनी अमृत उद्योग समूह दुमदुमून गेला. या…
महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान, मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले होते. मेजर घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेदखान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत,…
संगमनेर, प्रतिनिधी: सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. देशसेवा बजावताना घोडेकर यांना वीरमरण आले आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा उल्लेखनीय असल्याने त्यांचे संगमनेरात यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करत यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे)शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिल्लीत कर्तव्य बजावत असताना जवान संदीप घोडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये त्यांच्यावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहताना सूर्यवंशी यांनी ही मागणी केली. सामान्य कुटुंबात परिस्थितीवर मात करत संगमनेरकर असलेल्या संदीप घोडेकर यांनी सीआरपीएफ जवान म्हणून…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसच्या फिटनेसचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे…
पुणे – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे (अ.जा.) जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे यांना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायावरील उपचारासाठी ११ जुलैला रुग्णालयात दाखल झालेल्या गावित्रे यांच्यावर मंगळवारी (१५ जुलै) रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गावित्रे यांना पुढील काही दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते संगमनेरात परतणार आहे.
संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी केवळ एक सेवाभावी संघटना नव्हे, तर ‘समाजसेवक घडवणारी जीवनशाळा’ आहे, एक उत्तम रोटेरियन कसा असावा आणि समाजाशी त्याचे नाते किती घट्ट असावे असे संबोधत रोटरीच्या ४२ वर्षांच्या समाजकार्याचा डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी गौरव केला. २०२५-२६ या वर्षासाठी विश्वनाथ मालाणी यांची अध्यक्षपदी, सौरभ म्हाळस यांची सचिवपदी, तर संकेत काजळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब संगमनेरने नुकताच आपला वार्षिक पदग्रहण सोहळा मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवार, १३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याला डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आणि…
