Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. त्यामुळे शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी जाहीर केले. मात्र आता काँग्रेसनेच या पदावर दावा केला आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचाच विरोधी पक्ष नेता असेल असे सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचे संकेत दिले. थोरात म्हणाले, राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार जर सत्तेतून खाली खेचायचे असेल तर आपल्याला महाविकास आघाडी भक्कम ठेवावी लागणार आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विरोधी पक्ष नेत्याचे नाव घोषित केले जाईल. काँग्रेस सभागृहातील 45 आमदार असलेल्या सर्वात मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथीचे सत्र सुरूच आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना (ठाकरे) प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणून गोऱ्हे यांच्याकडे बघितले जात होते. त्यामुळे गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश आश्चर्यकारक मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या गोऱ्हे यांच्याकडे महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून बघितले जात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने येत्या १५ व १६ जुलैला संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या सहा गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चार प्रकारात राज्य पातळीवर जाण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली आहे. स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने १३ जुलै पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुका स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया व नॅशनल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राने सुवर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या वर्षभरात लाचखोरीने कळस घातल्याचे दिसून येत असून लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अनेक छोटे-मोठे लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकत असताना पोलीस उपनिरीक्षकाला 15 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले आहे. लाचखोरी करणाऱ्या या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव गणपत महादू काकड असे असून ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एसीबीने गुरुवारी दुपारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. दररोज लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक काकड याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपये ठरली. तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये स्वीकारत असताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपासात पोलिसांना सहकार्य करण्याच्या व हर्बल औषधांसह कोणत्याही प्रकारचे औषध रुग्णांना न देण्याच्या अटीवर संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ‘त्या’ डॉक्टरला तब्बल महिनाभरानंतर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव डॉक्टर प्रतिभा कचकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावेद आयुब शेख यांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम 1961 च्या कलम 33 व 37 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. शेख यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन शेख यांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पुरोगामी विचारांचे पाईक व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे टीडीएफ या राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल यांच्या चिन्नण्णा’ या पुस्तकाचा रविवारी (9 जुलै) 4 वाजता सह्याद्री महाविद्यालयांच्या के. बी. दादा सभागृहात प्रकाशन सोहळा आयोजित केल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. हिरालाल पगडाल हे फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचे विचारवंत व लेखक असून त्यांचे यापूर्वीही ‘इलेक्शन बिलेक्शन’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. चिन्नण्णा पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते होणार असून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको असं असताना देखील संगमनेर येथील पुनम तुषार ओहरा यांनी आपले केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले. कर्तव्यम फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम करण्यात आला आहे. ओहरा या कर्तव्यम फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष तुषार ओहरा यांच्या पत्नी आहेत. त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देत आहे. त्यांना सामजिक कार्याची आवड आहे. त्या सोशल मिडीयावर सोशल ॲक्टीव्हीटीचे व्हिडीओ बघत असताना त्यांना एक व्हिडीओ दिसला की, ज्यात एक मुलगी आपले संपुर्ण केस हे कॅन्सर पिडीतासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यामध्ये जमिनीचा नकाशा आणि अहवाल सादर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या राहाता भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपालास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. विकास सूर्यभान दुशिंग (वय ५१ वर्ष, रा. शारदानगर, कोपरगाव) असे या लाचखोर अभिलेखपालाचे नाव आहे. एसीबीच्या अहमदनगर युनिटने सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई केली. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर येथील तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी लाचखोर अधिकाऱ्यास पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. यात २५ हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेखचा वर्ग ३ चा अधिकारी विकास दुशिंग अलगत जाळ्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत मंत्रीपदी आरुढ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचे कारण स्पष्ट करताना “आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात ‘शिंदे-फडणवीस-पवार’ सरकार सत्तेत आल्यानंतर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आज मुंबईत बैठका पार पडल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थकांच्या मेळाव्यामध्ये मंत्री भुजबळ बोलत…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य पाठोपाठ आता मुंबईत आणखी एका तरुणीची निर्घून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुंबई महिलांसाठी असुरक्षित बनल्याचे समोर येत आहे. मुंबईच्या वरळी सी फेसवर एका गोणीमध्ये हातपाय-तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अशा पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या तरुणीचे वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान वरळी पोलिसांनी अज्ञाता विरोधात या युवतीच्या हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या आधी श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू गार्डन जवळील औषध दुकानामध्ये औषध घेण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने औषध विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत जोडीदारासह पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत या दोघा भामट्यांना पाठलाग करत पकडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या संदर्भात औषध विक्रेत्या महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा दागिने चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा…
महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतदेहांची ओळख न पटल्याने सामूहिक अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे राजभवनात शपथविधीचे नाट्य सुरू होते. महाराष्ट्र अपघाताच्या घटनेने हळहळत असताना राज्याच्या राजकारणात सत्तेच्या सारीपाटाचा आनंदी सोहळा रंगला होता. या पार्श्वभूमीवर अकोला येथील ॲड. अनंत खेळकर यांची यावर भाष्य करणारी कविता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी सोशल मीडियाच्या सौजन्याने आम्ही ती आपणासाठी देत आहोत. ——————– तिकडे समृध्दी महामार्गावर झाले देहाचे कोळसे ईकडे मात्र राजकारण घेत होते ‘वळसे’ ओळख पटली नाही म्हणून सामुहिक अंत्यविधी तिकडे त्यांची चिता जळाली ईकडे ह्यांचा ‘शपथविधी’ …
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचे स्वागत भाजपा मराठा समाजाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केले. मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यु-एस वर्ल्ड २०० च्या आता मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. ही योजना २०२३-२४…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवार यांच्यासह आठ नव्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाल मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागांचे प्रधान सचिव वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजित पवारांसह नव्या आठ मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होती. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय संक्षिप्त स्वरूपात :- * राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन (ऊर्जा विभाग) * मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रांताधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याला संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी ३० ऑक्टोंबर २०२२ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या एक वर्षाच्या कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. गडाख हा हद्दपारीच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्येच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावर निमोण गावच्या शिवारात निमोण – पारेगाव गडाख फाट्यावर पोलिसांना आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख हा आढळून आला. प्रांत अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत आढळून आल्याने पोलिसांनी त्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्गावरील आणि नो टाईम झोन मधील ‘पंचवटी’ बंगल्यावर सोमवारी सकाळी ड्रोन उडत असल्याचं सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ खळबळ माजली होती. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एसपीजीने (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर दिल्ली पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी पंतप्रधानांचे निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान या ड्रोनबाबत अद्याप पोलिसांना तपास लागू शकला नाही. ड्रोन नेमकं कोणाचं होतं, याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहे. तसेच ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न देखील अद्याप…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनुदानित – विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी शिक्षण संस्थांकडून अवास्तव फी आकारणी केली जात आहे. या फी मध्ये कपात करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्यावतीने उपशहरप्रमुख फैसल सय्यद व युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळा महाविद्यालयांना निवेदन देत केली आहे. नॅशनल इंग्लिश मीडियमसह शहरातील अन्य शैक्षणिक संस्थांना हे निवेदन देण्यात आले असल्याचे सय्यद यांच्यासह युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेना समन्वयक अक्षय बिल्लाडे यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यात शासनाचं अनुदान स्कॉलरशिप व कॅटेगिरी फार्म भरून देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, जवळे कडलग आणि पेमगिरी येथे पाण्यात पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी बराच काळ उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथील अनुकूल सत्यवान मेंढे (वय २१ वर्षे) या तरुणांचा निळवंडेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मेंढे याला उपचारासाठी रात्री संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर विविध शासकीय विभाग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, संतोष हासे,ॲड. मधुकर गुंजाळ, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी…
