Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संजय राऊत यांच्या धाडसाचं तसेच त्यांच्या कुटुंबीयांचही कौतुक वाटतं. संजयला बेकायदेशीररित्या पत्राचाळ प्रकरणात अडकवण्यात आल. मी न्यायदेवतेचे आभार मानतो, कारण त्यांनी योग्य तो न्याय केला. या प्रकरणावरून सिद्ध झाले की केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत आहे. खासदार राऊत यांनी जामीनावर सुटल्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. खासदार राऊत यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात नवं सरकार सत्तारूढ झाल, त्यावेळी मी तुरुंगात होतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातल्या सरकार तेच चालवत आहे आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या फडणीसांविषयीच्या कौतुकास्पद उद्गाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बुधवारी रात्री तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.…
प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाचा निधी इतरत्र वळविल्याने शिक्षण संचालकांकडून कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन विहित मुदतीत न दिल्याच्या कारणावरून आणि उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करत शासनाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावरून तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. असे असताना देखील राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही. पुरेसे अनुदान उपलब्ध करून देऊन देखील वेळेत शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे. वितरित करण्यात आलेले अनुदान हे केवळ नियमित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते व खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुगांतून तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर सुटले आहे. शिवसेनेची बुलंद तोफ असलेले राऊत तीन महिन्यानंतर पुन्हा परतले असून ‘टायगर इज बॅक’ अशा घोषणा देत संगमनेरमध्ये त्यांच्या सुटकेचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.बसस्थानक चौकात शहरप्रमुख प्रसाद पवार, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जालिंदर लहामगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जालींदर लहामगे आदींसह शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या सुटकेचे स्वागत केले. फटाक्याच्या आतीषबाजीने बसस्थानकाचा परिसर दुमदुमला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल १०१ दिवस तुरुंगात असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी त्यांची आर्थररोड कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊतांची सुटका झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. गळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे कारागृहाबाहेरील परिसर कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. बाहेर येताच राऊत यांनी स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि गाडीत बसून गेले. यावेळी माध्यमांशी…
सुयोग्य व्यवस्थापन व तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून समितीचे जलद कामकाज महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत राज्यात ८५,८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ६३४४ प्रकरणे एकट्या अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या कामकाजामुळे अहमदनगर जिल्हा समिती राज्यात अव्वल ठरली आहे. बार्टीने सेवा पंधरवडा कालावधी सुरू झाल्यापासून ते ८ नोव्हेंबर पर्यंत राज्यात निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयुक्त यु. पी. मदान यांनी जाहीर केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकाही याच दिवशी होणार आहेत. ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची नोटीस स्थानिक ठिकाणचे तहसीलदार 18 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणार आहेत. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2022 या दरम्यान दाखल करावयाच्या आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार असून 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांना अखेरीस आज विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून टायगर परत आलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएल न्यायालयात सुनावणीचे काम पूर्ण झाले होते. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टी अगोदर झालेल्या सुनावणी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करत लेखी म्हणणे देण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र जामीना संबंधीच्या याचिकेवरील आदेश 9 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दिल्लीत टॅक्स इंडिया ऑनलाईन पोर्टल आयोजित अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असते. उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे एखाद्या देशाचा कसा विकास होतो, याचे उत्तम उदाहरण चीन आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे महाराष्ट्राचा मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे मंगळवारी संगमनेरमध्ये भव्य स्वागत करत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे येथील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी निवडीवरून उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटात मोठे रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले असून या दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्याविरोधात आंदोलने केली होती. पक्षांतर्गत गटबाजी या निमित्ताने थेट पुणे प्रथमत:च समोर आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींना स्थगिती देण्यात आल्याने संगमनेरमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले. सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते. तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हिमाचलमधील काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सहवीस नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्वांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असून येत्या चार दिवसात म्हणजेच 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. तत्पूर्वीच या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या माहोलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यावेळी सिमला येथील भाजप उमेदवार संजय सुद हे देखील उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल 26 नेते काँग्रेस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले टोल नाका प्रशासना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत आंदोलकांच्या मागण्या पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांना दिले. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जाऊन देखील, शेकडो लोक जखमी होऊन देखील, महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेकांना विकलांगपणा येऊन देखील जागे न होणाऱ्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाकडून केवळ वाहनचालकांकडून टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते. पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसाळ्यातील दोन प्रशासनाच्या कार्यालयासमोर सुरू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये आली असताना या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. स्वागता दरम्यान यात्रेला महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खासदार गांधी गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंहजी फतेहसिंहजी गुरुद्वारामध्ये पारंपारिक शिखांच्या वेशात पोहोचले. तेथे त्यांनी गुरुनानकांसमोर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. देगलूर मध्ये मोठा उत्साह आणि वातावरण काँग्रेसमय ‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश देणारी गांधी यांच्या नेतृत्वाखालील…
राज्याच्या गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश; राज्यातील तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याच्या गृह विभागाने सोमवारी तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यापैकी 104 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे तर नऊ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत. बदल्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या पोलिस दलात सोमवारी मोठे फेरबदल केले. गृह विभागाने काढलेल्या आदेशामध्ये प्रसाद अक्कानारू, श्रीमती श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रय कांबळे आणि श्रीमती ज्योती क्षीरसागर या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने आज काढलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर टिकास्त्र सोडणारे पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमधील मातब्बर नेते व प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्या मेघना काकडे-माने यांनी मातोश्रीत उध्दव ठाकले यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे. मुंबईच्या अंधेरीस्थित असलेल्या काकडे-माने यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत ‘मशाल’ हाती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. काकडे-माने यांच्या शिवसेना प्रवेशावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह नीलम गोर्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन अहिर, आदेश बांदेकर हे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. काकडे-माने यांचे वडील अंकुश काकडे हे राष्ट्रवादीतील बडे प्रस्थ आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे ते प्रवक्ते असून आजही त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात न्यायालयीन प्रकरणे आपसात सामंजस्याने मिटविण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरणांची यादी सादर करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. भारतीय दंड संहितेच्या फौजदारी प्रसंहिता कलम ३२० प्रमाणे (न्यायालयाच्या परवानगीने) 298, 312, 323, 325, 334, 335, 337, 338, 341, 342, 343, 344, 346, 352, 355, 357, 358, 379, 381, 403, 406, 407, 411, 414, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 426, 427,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा जाळल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या शहरप्रमुखासह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद जयवंत पवार, गुलाब पांडुरंग भोसले, अमोल त्रंबक कवडे आणि रवींद्र उर्फ पप्प्या नंदू कानकाटे यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला असून संगमनेर शिवसेनेत संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे समर्थकांचे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या तक्रारीवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कारागृहातून रजेवर गेलेला कैदी अद्याप परतला नाही, तब्बल वर्षानंतर जाग्या झालेल्या कारागृह प्रशासनाने या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कांतीलाल पंचाळ असे या कायद्याचे नाव असून तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना पंचाळ याने कारागृह प्रशासनाकडे काही दिवसांसाठी सुट्टीची मागणी केली होती. नाशिक रोड कारागृह प्रशासनाने त्याला 30 एप्रिल 2021 ते 16 मे 2021 अशी सुट्टी मंजूर केली होती. रजेवर गेलेला हा कैदी 16 मे 2021 मध्ये पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते. मात्र हा कैदी पुन्हा आजतागायत नाशिक रोड कारागृहात परतला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल वर्षभराचा कालावधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही. शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
