Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…

Read More

अहिल्यानगर, दि. २५ जुलै:  शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले.  या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  अहिल्यानगर:  या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तब्बल दीड कोटीचा ऑनलाईन लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याच्या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच आहेर यांची देखील आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आहेर यांच्या बदलीमागे देखील याच प्रकरणाचा वास असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. दरम्यान आहेर यांच्या जागी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  १४० वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगमनेर येथील सर डी.एम. पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) कैलास सोमाणी यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व करत, माजी विद्यार्थ्यांकडून यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याने पेटिट विद्यालयाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात, सर डी.एम. पेटीट विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्राचार्य चौधरी, माजी प्राचार्य रामनाथ जगताप, श्रीकांत अरगडे, वनम सर, राधेश्याम राठी आदी मान्यवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहाता: कर्जमाफी, सातबारा कोरा, पीक विमा आणि वीजबिल माफीसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले राहाता तालुक्यातील शेतकरी आता शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी १० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे करणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अकोले:  अकोले तालुक्यातील तिरडे येथील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक, त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि एका शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत असताना, हा प्रकार घडला. जेव्हा ती आठवीत होती, तेव्हापासूनच धुपेकर नावाचा शिक्षक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) तासिका संपल्यानंतर वर्गात येऊन तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. एका जेवणाच्या सुट्टीत धुपेकर वर्गात आले आणि पीडित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  राज्यभरात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (तुकडेजोड तुकडेबंदी कायदा) या कायद्याचा सर्रास भंग होत असताना, एकट्या संगमनेर तालुक्यात ११ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने महसूल विभागात तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात बेकायदेशीर तुकड्यांचे नियमितीकरण करून शासनाला २ कोटींहून अधिक महसूल मिळवून दिला असताना, कौतुकाऐवजी निलंबनाची शिक्षा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिलेल्या उत्तराने या प्रकरणाला अधिक धार दिली आहे. त्यांनी मान्य केले की, सर्वच मतदारसंघात शेतजमिनीच्या तुकड्यांचा प्रश्न गंभीर आहे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोणी विनयभंगाच्या, तर कोणी बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा डॉक्टरांकडून विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (22 जुलै) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुरण येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मागील दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉ. राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच संगमनेर येथे एका धक्कादायक घटनेने पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत.  संगमनेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीने हे प्रकरण सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. काय आहे प्रकरण? १९ जानेवारी २०२३ रोजी कतारी यांनी संगमनेर शहर पोलीस…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेत आणि निर्वाचक गण रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) सरूनाथ सुखदेव उंबरकर यांनी केला असून या संदर्भात जिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक अधिकारी) यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केला आहे. २१ जुलै २०२५ रोजी संगमनेर तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उंबरकर यांनी आपल्या हरकतीमध्ये म्हटले आहे की, संगमनेर तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचना आणि निर्वाचक गण रचना करताना शासकीय नियमांचे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर २०११ च्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक विभाग/निर्वाचक गण रचना उत्तर…

Read More

महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त  अहिल्यानगर:  अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.  अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करत आहे. या प्रकरणातील फिर्यादीने ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त:  पुणे शहरात दारूच्या व्यसनावरून होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. फुरसुंगी परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरेश बाबुराव जमदाडे (वय ५९, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. मयत प्रशांत याला दारूचे तीव्र व्यसन होते. या व्यसनामुळे तो घरात नेहमीच वाद घालत असे, ज्यामुळे कुटुंबातील शांतता भंग पावत होती.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडळ अधिकारी आणि तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी आलोकचंद्र चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड या पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने राजेंद्र गायकवाड हे घरीच होते. त्यांची पत्नी दौंड येथे गेली होती, तर १२ आणि १४ वर्षांची त्यांची दोन्ही मुले शाळेत होती. दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना अनेक वेळा फोन केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. शाळा सुटल्यावर मुले घरी परतली असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला.…

Read More

शिर्डी – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांना शिर्डीतील या अध्यात्मिक सोहळ्यासाठी आमंत्रित केले. या शिवकथा महोत्सवाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंबियांनी स्वीकारली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी आणि अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींकडून शिवकथेसारखा अध्यात्मिक सोहळा आयोजित करण्याची सातत्याने विनंती केली जात होती. या भक्तीभावाला प्रतिसाद देत डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा पुढाकार घेतला…

Read More

राज्य विधानमंडळ इतकं खाली गेलंय, हे ऐकून मन विचलित होतं. 1978 पासून या सभागृहांशी संबंधित असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकली की वाईट वाटतं. इतकासा आवाज चढला तरी पीठासनावरील अधिकार्‍याची भीती वाटायची. मारामारी हा तर विषयच नसायचा. अगदीच नाराजी व्यक्त करण्यासाठी विरोधकांकडून आयुधांचा वापर व्हायचा. पण त्यासाठी हातघाईवर यायची आवश्यकता पडत नसे. एकेका सदस्याचा मान इतका तोडीचा असायचा की पीठासनावरील अधिकारीच त्याची काळजी घेत. महाराष्ट्राचं हीत हेच या सगळ्यांचं ध्येय असायचं. सभागृहातल्या उच्चकोटीच्या चर्चा ही तर दोन्ही सभागृहातील पर्वणीच. असे असंख्य प्रकरणं सांगता येतील, ज्यात उशिरापर्यंत सदस्य सभागृहात थांबायचे. चिंता महाराष्ट्राची असायची. आता ते राहिलं…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  सध्याच्या तरुण पिढीने मोबाईलवरील ‘रील’ बनण्याऐवजी जीवनात ‘रियल’ आदर्श निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. छत्रपती प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. कांगणे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानण्याचे आवाहन तरुणांना केले. ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर जागरूकतेसाठी करावा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नये. दुर्दैवाने आजच्या पिढीचे आदर्श बदलत असून, तरुणांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी. क्षणिक प्रसिद्धीच्या मागे न लागता कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवन बदलता येते, असे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर, दि. १९: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी तथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी येवती (ता. श्रीगोंदा) येथील एका वृद्ध दांपत्याला त्यांची सुनेने बळकावलेली वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे तहसीलदारांना ही जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येवती येथील ज्ञानदेव दिनकर आढाव आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई आढाव या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे, विजय आढाव यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सून,…

Read More