Author: Annant Ppangarkar
मुंबई, २१ जून, २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४,…
संगमनेर, प्रतिनिधी आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत…
शुक्रवार २० जून – अहिल्यानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज…
संगमनेर, प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने आरोपीला अटक करून ताब्यात घेण्याचे आदेश मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आंबी खालसा (संगमनेर) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले यास यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याला मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह पकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते. दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन मार्फत सरकार पक्षातर्फे संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर…
शुक्रवार 20 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या आकाशवाणी चौक परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय वराडे (रा. जळगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे, तो एक ठेकेदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा आकाशवाणी चौकातून जात असताना, वराडे यांनी अचानक ताफ्यासमोर येत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान…
गुरुवार 19 जून – पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे सिगारेट ओढू नको असे सांगितल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश उत्तम जोगदंड (वय 21), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19), आकाश सुभाष भिसे (वय 21), आणि भागवत मुंजाजी आसुरी (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथील नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर पाच जणांचे एक टोळके सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी…
गुरुवार १९ जून, – अकोले: मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अकोले तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे, आंबीत धरणानंतर आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे वेगाने झेपावला आहे. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुळा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६०० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने…
अहिल्यानगर, प्रतिनिधी: एका विवाहितेवर घरात घुसून चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (१७ जून) सकाळच्या सुमारास घडली. पीडित विवाहितेवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडितेने बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, चार अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. यातील एका संशयिताने विवाहितेच्या तोंडात कापडी बोळा कोंबला होता. त्यानंतर इतर तिघांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक अत्याचार केला. सध्या पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला असून…
गुरुवार, 19 जून- संगमनेर : धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. याच विचाराने एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आणि जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने शनिवारी, 21 जून 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन महिलांच्या आरोग्य आणि सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने या निमित्ताने सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हे भव्य योग शिबिर आयोजित…
मुंबई, १९ जून: राज्यात दूध भेसळ थांबवण्यासाठी लवकरच एक नवीन कायदा लागू केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रालयात दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नवीन कायद्यामुळे राज्यातील दूध भेसळीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीला दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, तसेच राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दूध संघांच्या प्रतिनिधींनी राज्यात दुधासाठी समान दर असावा, तसेच ‘एक राज्य एक ब्रँड’, ‘एक जिल्हा एक दूध संघ’ आणि ‘एक गाव एक दूध संस्था’ स्थापन…
गुरुवार, 19 जून: संगमनेर संगमनेर शहरात ATM फसवणुकीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून पैसे काढताना पिन नंबर पाहून कार्ड बदलून 35,100/- रुपयांची फसवणूक केल्याची ही घटना बुधवारी समोर आली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (गु.र.नं. 558/2025, बीएनएस कलम 318(4) प्रमाणे) दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? बुधवार, 18 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास संगमनेर येथील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे (वय 48) हे एटीएममधून पैसे…
संगमनेर, प्रतिनिधी आत्ताच आम्ही सात लाखाची चोरी पकडली असून तुमच्यावर आमचा संशय आहे, असे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीला तिघांनी सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लुटण्यात आले. बनावट सीआयडी अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास करण्याची घटना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर चौधरी ढाब्याजवळ घडली आहे. 14 जून 2025 रोजी सकाळी अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा ( No. 0391/2025) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी गेलेले केशव नाथा गोसावी (वय 69,…
अहिल्यानगर, दि.१८ – रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील स्वावलंबनासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असून विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हा व्यवसाय मदत करू शकतो. मागील वर्षात जिल्ह्यात ६६८ शेतकऱ्यांनी ३१६ हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन २ लाख ६५ हजार अंडीपुंज व १५१ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षात रेशीम शेतीसाठी १०२ शेतकऱ्यांना ८५ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली. रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची चढउतार आणि वाढती…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी, तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांनी मंगळवारी (दि. १७) संगमनेर शहरात निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. शेतात शौचाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील बस स्थानकासमोर हा रास्ता रोको करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चाने बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोदरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली.…
पुणे: मुळशीचे तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. सात-बारा उताऱ्यावरील ‘द टाटा पॉवर कंपनी लि.’चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कात दाखल करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अनियमिततेप्रकरणी राज्य सरकारने सोमवारी निलंबनाचे आदेश जारी केले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या प्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४१, १४० आणि १५५ नुसार, भोसले यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाव कमी करण्याचा दिलेला आदेश रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर या अनियमिततेची चौकशी अतिरिक्त विभागीय…
अहिल्यानगर, १८ जून २०२५: पाथर्डी (अहिल्यानगर) येथील शिवनेरी मिसळच्या हॉटेल चालकाकडून मासिक हप्ता म्हणून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय २२) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाथर्डी येथे ‘शिवनेरी मिसळ’ नावाचे हॉटेल असून, ते रात्री १० नंतरही सुरू असते. यावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराकडे मासिक २००० रुपये हप्त्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२५ रोजी नाशिक…
अहिल्यानगर, १८ जून: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अहिल्यानगरमध्ये मंगळवारी एका खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराला भिंगारच्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची तारीख मंडळ अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यासाठी, जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय ३०, रा. एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर) या खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याने २०,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १७ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता जहीर मुलानी याने पंचांसमक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…
मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र…
संगमनेर, प्रतिनिधी- महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या. यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी…
