Author: Annant Ppangarkar

विशेष प्रतिनिधी / मुंबई इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून खात्मा करण्यात येईल, अशी धमकी सावंत यांना दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून चार दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आहे. कोरटकर सध्या फरार आहे. यातच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी दिल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने…

Read More

राहुल जाधव पाटील रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो. सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा…

Read More

संगमनेर, दि. २८ फेब्रुवारी  एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या सीटवर गळ्यातील मंगळसूत्रामधील मनी पडले असता महिलेला आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) संगमनेर बस स्थानकावर हा प्रकार घडला. संगमनेर बस स्थानकामधून महिलांच्या गळ्यातील दागिने वारंवार चोरी जात आहे. दागिने चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून दिवसाढवळ्या ते महिलांच्या गळ्यातील दागिन्यांच्या चोऱ्या करत आहे. दागिने चोरट्यांसाठी संगमनेर बस स्थानक आणि बसस्थानकावरील गर्दी फायद्याची ठरत आहे. बस स्थानकावर असलेल्या एखाद-दोन पोलिसांचा डोळा चुकवून बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतही चोऱ्या होऊ लागल्याने संगमनेरचे बस स्थानक महिलांसाठी असुरक्षित बनू लागले आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील…

Read More

नागपूर : जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने याचिकाकर्ता मुलाच्या वडिलांना जातवैधता प्रमाणपत्र दिले, त्याच्या भावाला आणि बहिणीला देखील दिले. मात्र याचिकाकर्ता मुलाने समितीकडे अर्ज केल्यावर कागदपत्रे पुरेशी नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या या कृतीला बेकादेशीर ठरवत वडील, भाऊ-बहिणीकडे जातवैधता असताना समितीने इतर कागदपत्रे तपासण्याची गरजच नव्हती, असे निरीक्षण नोंदवले आणि समितीचा आदेश रद्द केला. तसेच एका महिन्यात याचिकाकर्त्याला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही मुख्य न्या. आलोक आराध्ये आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने समितीला दिले. ऋषी बळवंत दडमल या विद्यार्थ्याने नागपूरच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ‘माना’ जनजाती समूहाचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता.…

Read More

नीरज बाबासाहेब गाढे –  साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहिल्यानगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येथे स्थापित केलेले वाळूचे शिवलिंग पुढे जाऊन कोल्हाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. याच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे ७ मे १९५९ रोजी राजेंद्र शिवाजीराव गाढे यांचा गाढे पाटील कुटुंबात जन्म झाला. पुढे “गाढे काका” या नावाने संगमनेर, घुलेवाडी परिसरात ओळखले जाणारे हे सुंदर नेतृत्व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने काळाआड गेले व सर्वांचे आवडते, सर्वाना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणारे, कुठेही भेटल्यावर पोटभरून गप्पा…

Read More

पुणे, दि. २८ फेब्रुवारी  २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसांपासून फरार होता. फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बड्या राजकीय नेत्याच पोरग तीन तासात सापडतं आणि अत्याचार करणारा नराधम आरोपी…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी विधान परिषदेच्या उपसभापती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी संगमनेरमध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमा दहन करण्यात आली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यावेळी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी –  मोठा गाजावाजा करत संगमनेर नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने संगमनेरमधील पाच कत्तलखाने नेस्तनाबूत केले असले तरी देखील संगमनेरात अद्यापही गोवंश हत्या सुरूच आहे. संगमनेरमधील कत्तलखान्यावर थेट अहिल्यानगर एलसीबीने कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत १२०० किलो गोमांसासह तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेरमधील जमजम कॉलनीमध्ये अब्दुल समद कुरेशी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातूरकर, विशाल तनपुरे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश जनावरे…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील महिलांकडून जागृत महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचच्या अध्यक्षपदी तळेगाव येथील साक्षी दिघे, उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके, सचिव पदी पेमगिरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सुनिता रोहिदास खताळ (धांदरफळ खुर्द), मंदा निळे (मिर्झापूर), ज्योत्स्ना कदम (संगमनेर), लक्ष्मी तूपसुंदर (गुंजाळवाडी), शितल पांडे (पिंपळगाव माथा), मुक्ता सांगळे, लता सावंत (पिंपळगाव माथा), निर्मला दिघे (तळेगाव) यांचे तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत मंगळवारी संगमनेर खुर्द येथे झालेल्या बैठकीत या संगमनेर शाखेची स्थापना केली. बैठकीसाठी…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. “आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या” असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाविषयी भूमिका मांडणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आता ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिला आहे. इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा आणि त्याचा आशय…

Read More

संगमनेर, दि. २६ फेब्रुवारी  राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असायला हवे मात्र, धर्माचा आधार घेत सत्ताधाऱ्यांनी टोकाचे राजकारण केले आहे. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करत यश मिळविले असले तरी जनतेच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरलेली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस आणि लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने आता “हर हर महादेव” म्हणत पुन्हा मैदानात उतरावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची सहविचार बैठक जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी थोरात बोलत होते. ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, प्रभावती घोगरे, मधुकरराव नवले, डॉ. जयश्री थोरात, संपतराव म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानेश्वर…

Read More

संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी – नासिक पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रॉबरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फिर्यादीत आरोपी निघाला असून त्याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. फिर्यादीने खोटी माहिती देत अन्य तिघांच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. ३१ जानेवारीला रात्री पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप मध्ये प्रवासी म्हणून संगमनेरला जाण्यासाठी बसलेल्या दोघाजणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ट्रक चालकाला बेशुद्ध करून त्याच्या ताब्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे शेतीचे औषध लंपास केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणी तपास करत होते. काय…

Read More

संगमनेर –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून राज्यात ओळख असलेले सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार सहकार चळवळीतील अग्रणी नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सहकार, कला, साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार देण्यात येत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळातून केलेल्या पायाभूत व ऐतिहासिक कामांमुळे कृषी, महसूल, शिक्षण, जलसंधारण या…

Read More

दि. २५ फेब्रुवारी – १९८४ च्या शिखविरोधी दंगली प्रकरणी दिल्लीच्या राऊस आव्हेनू न्यायालयाने काँग्रेस नेते माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरविले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय २१ फेब्रुवारीला राखून ठेवला होता. शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात आज हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगल भडकली होती. काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल भडकली, असा आरोप आहे. या संदर्भात…

Read More

संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी  संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी पकडलेला आरोपी ज्या ग्रामपंचायतमध्ये काम करत होता त्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांकडे बनावट नोटासंदर्भात चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद संगमनेरमध्ये कुरिअर मार्फत प्राप्त झाल्याची माहिती पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होते. या अधिकाऱ्यांसह संगमनेरच्या स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत नोटा छापण्यासाठीचा मुद्देमाल…

Read More

ॲड. श्रेयस देशमुख, पुणे भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल क्रांती मोठ्या वेगाने घडत आहे. सरकारी योजनांपासून ते बँकिंग सेवांपर्यंत सर्वच क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत देशाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे भारतपोल. हे पोर्टल म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत यंत्रणांना आणि पोलीस दलांना एका जागी आणणारी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि भौगोलिक विस्तार असलेल्या देशात गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मची गरज होती, जी भारतपोलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आधुनिक…

Read More

संगमनेर, दि. २४ प्रतिनिधी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर्षी देखील शिवाजी जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी गोविंद नागरे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तिथीनुसार येत्या १७ मार्चला शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून दरवर्षी शिव जयंती उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवभक्त, नागरिक देखील या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार…

Read More

संगमनेर – रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे आयोजित करण्यात आलेला ‘आनंदी रस्ते’ हा अनोखा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. शहरातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. रोटरी क्लबच्या आनंदी रस्ते या उपक्रमात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात तसेच संगमनेर शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते आणि यामध्ये विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलने गायन, पथनाट्य, मल्लखांब तसेच वादनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्रयागराज कुंभमेळ्याच्या थीमवर आधारित आयोजन होते, ज्यामध्ये अघोरी साधू…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात येथून मागे राजकारण झाले होते. परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल. ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. तालुक्यातील ७,१४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आले असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात देण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव…

Read More