Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केंद्र सरकारकडून देशभर राबविल्या जात असलेल्या “मेरी मिट्टी मेरा देश”अभियानात संगमनेर नगर परिषदेने सहभागी होत क्रांती दिनी संगमनेरमध्ये विविध उपक्रम राबविले, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सूचित केल्यानुसार राज्यभरात देखील 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान “मेरी मिट्टी मेरा देश”अभियान राबविले जात आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहिदांच्या स्मृतीस अभिवादन: याच अभियानाचा एक भाग म्हणून संगमनेर नगर परिषदेत देखील क्रांती देणे 9 ऑगस्टला “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानांतर्गत शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या अशोक…

Read More

आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात रॅली आणि मेळावा महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवचकुंडले आहे, मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आपसात भेद निर्माण करू पाहत आहे. मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेली अत्याचाराची घटना देशासाठी कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. रॅली आणि मेळावा: आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीत शेकडो आदिवासी, शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली. त्यानंतर मालपाणी लॉन्समध्ये…

Read More

अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू असताना नाशिकमध्ये एक तहसीलदार लाच स्वीकारतो, ही शरमेची बाब आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून न घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात कठोर बदल करण्याचा इशारा देत अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिर्डीत होणार कार्यक्रम: शुक्रवारी (ता. 11 ऑगस्ट) शिर्डी येथे “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते अहमदनगर येथे आले होते. महसूल विभागाच्या आढावा…

Read More

अविनाश बोधक, साईसुधा बच्चा–वनम, सविता हासे–घोलप आणि स्वप्नाली भुतडा–तापडे पहिल्या तीन क्रमांकात  महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – संगमनेर महाविद्यालय सुरू असलेल्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा 2022-23 यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अविनाश बोधक यांनी 73.28 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर साईसुद्धा बच्चा–वनम व सविता हासे–घोलप यांनी 71.42 टक्के गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय तर स्वप्नाली भुतडा–तापडे यांनी 70.14 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली. बारा वर्षापासून सुरू आहे अभ्यासक्रम: शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षापासून सावित्रीबाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मातृभूमी विषयी कृतज्ञता आणि स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाच्या स्मरण व्हावे यासाठी 9 ऑगस्ट पासून देशात “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान सुरू होत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व अभियानाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर, लोकसभा प्रभारी नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभागातून पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन…

Read More

जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले. कार्यशाळेला यांची होती उपस्थिती: मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व दे असरा या संस्थेच्यावतीने व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ. आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले,…

Read More

लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हे नेते करणार नेतृत्व: गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा व त्याची सुनावणी संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. का गेले होते सुप्रीम कोर्टात: इंदुरीकर महाराज यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयात इंदुरीकर यांना दिलासा मिळाल्यानंतर प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहोचले होते. तेथे संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम करण्यात येऊन खटला चालविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काही दिवसांपूर्वी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरले आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विटर द्वारे केला आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय होत विरोधकांचे आर्थिक घोटाळे समोर आणू लागले आहेत. मंगळवारी त्यांनी ट्विटरवर मुलुंड येथील कोविड सेंटरच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याबद्दल आरोप केले आहेत. या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपली तोफ विरोधकांवर डागू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये आता टोमॅटो पाठोपाठ कांदाही वधारला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून प्रतिक्विंटल 2600 रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. असे मिळाले कांद्याला भाव: मंगळवारी (ता. 7 ऑगस्ट) झालेल्या कांदा लिलावामध्ये बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2000 ते 2600 रुपयांचा भाव मिळाला. त्या पाठोपाठ दोन नंबर कांद्याला 1200 ते 1800 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला. असा मिळाला टोमॅटोला बाजार: याशिवाय बाजार समितीत टोमँटोला 1000 ते 2500 रुपयांपर्यंतचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यानच्या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे भारत सरकारने निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. हर घर तिरंगा या अभियानाला पाठबळ देण्यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरु करण्यात आली असुन हे राष्ट्रध्वज प्रत्येकी २५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. स्थानिक टपाल कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल. याशिवाय नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावरही ई- टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर सुरेश एल. बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सध्या राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. या महसूल सप्ताहात सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत महसूल कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान नेत्रदान, अवयव दाना बाबत जागृती करण्यात येऊन कर्मचाऱ्यांकडून संमती पत्रे भरून घेण्यात आली. महसूल सप्ताह : लोकाभिमुख कामांचा करुया निपटारा चला करू ‘महसूल सप्ताह’ साजरा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात महसूल सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचे करण्यात आले आयोजन: या सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोमवारी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर तसेच नेत्रदान व अवयव दान बाबत संमती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार यावर्षी पुन्हा संगमनेर महाविद्यालय जाहीर झाला आहे. महाविद्यालयाने यावर्षी तब्बल दहा पुरस्कार प्राप्त करत संगमनेरचा सन्मान वाढविला. असे आहेत पुरस्कार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेवतीने राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थीभिमूख विविध उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणा-या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन कदम यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. प्रताप फलफले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक म्हणून उल्लेखनिय कार्य केल्याबदद्ल पुरस्कार प्रदान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारातील दीपस्तंभ थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दी निमित्त वर्षभरात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा महोत्सव साजरा होणार असून या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या शताब्दी महोत्सवाचा लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. यांनी केले अनावरण आणि यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शंकर खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जात असलेले संगमनेरचे विद्यार्थी आपल्या चमकदार कामगिरीने जगामध्ये देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. संगमनेर मर्चंटस बँकेच्यावतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मालपाणी बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी, स्किनवेस्ट या ब्युटी ब्रँडच्या प्रणेत्या दिव्या मालपाणी, चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री आदी उपस्थित होते. हे १० विद्यार्थी जाताहेत परदेशात : सिमरन अत्रे, जय गाडे, गंधार पानसरे, चिदंबर धापटकर, प्रणव पगडाल, तन्मय राठी, ओम कोळपकर, धनंजय सोनवणे, आयुष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केवळ सत्तेची लालसा आणि आमिषाला बळी पडून काही लोक मूळ शिवसेना सोडून गेले आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे नाव शिवसेनेसोबत जोडलेली आहे. त्यामुळे पक्षाबाहेर जाणाऱ्यांची चिंता करू नका. पक्षाचे संघटन वाढवा, असा सल्ला शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला. संवाद : शिवसेनेच्या संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिंदे शनिवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला. यांची होती उपस्थिती : गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे, उत्तर नगर जिल्हा शिवसेनाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख संजय फड, ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब गुंजाळ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेनेचे शहर प्रमुख…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो संभाजी भिडे ऊर्फ मनोहर भिडे याच्या उपद्रवाने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. शुक्रवारी संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा सर्वाधिक वेळ याच भिडेंच्या उपद्रवाने घेतला. विरोध करायचा त्यांनी विरोध केला पण आपल्या गृहमंत्र्यांनी राज्याची लाज रस्त्यावर आणली. भिडे हे आमच्यासाठी गुरुजीच असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी शिष्याचा निर्बुध्दपणा उघड केला. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली. देशातील महान व्यक्तींची अश्‍लाघ्य शब्दात अवहेलना करणार्‍या अर्धवट व्यक्तीची इतकी तळी आजवर कोणी उचलली नसेल. हे करून आपण भाजपला खड्ड्यात घालत आहोत याचीही जाण गृहमंत्रीपद सांभाळणार्‍या देवेंद्र फडणवीसांना राहिली नाही. एकीकडे सत्ता राखण्याचा व्याप सांभाळता सांभाळता दुर्बुध्द भिडेंसारख्याला गुरूचा दर्जा देऊन पक्षाला अधिक खायित टाकण्याचं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  नाशिक – राज्यात एकीकडे महसूलमंत्र्यांच्या संकल्पनेतून प्रथमच महसूल सप्ताह पाळला जात असताना या सप्ताह काळातच नाशिकच्या तहसीलदारांची लाचखोरी समोर आली आहे. तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या तहसीलदारास एसीबीने रंगेहात पकडले. नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय 44 वर्ष, रा. फ्लॅट नंबर 604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे एसीबीने पकडलेल्या लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. महसूल सप्ताहातच मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महसूल विभाग लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रथमच महसूल सप्ताह राबविण्यास सुरुवात केली आहे. या सप्ताहामध्ये महसूलच्या नायब तहसीलदारापाठोपाठ आता तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दोन दिवसांपूर्वीच…

Read More

आपल्या गरजा मर्यादित ठेवायला शिका : प्राचार्य गायकवाड महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी माणसाने स्वतःशी तसेच इतरांशी संवादी राहण्याची आवश्यकता आहे. याच संवादाच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्यातील ताणतणाव दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. भगवान जोशी यांनी केले. ताण-तणाव कार्यशाळा : संगमनेर महाविद्यालयात शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ताण-तणाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून जोशी बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, कुलसचिव संतोष फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते. …तर आयुष्यातील ताणतणाव दूर : जोशी म्हणाले, ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी संवाद फार महत्त्वाचा आहे. तो माणसाला निरोगी जगण्याचा…

Read More