Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | नाशिक भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता एसआयटीच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी दोन पोलीस उपअधीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकांसह एकूण चोवीस जणांचे विशेष पथक कार्यरत आहे. एसआयटीकडे या प्रकरणातील अकरा गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला असून, त्यामध्ये अशोक खरातवर दाखल असलेल्या नऊ गुन्ह्यांचा आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण अकरा गुन्ह्यांच्या तपासामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आठ प्रकरणांची नोंद झाली असून, उरलेली तीन प्रकरणे ही फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याशी संबंधित आहेत. आरोपीच्या…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरमधील ‘दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था आणि भ्रष्ट पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ठेवीदारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेची आणि गैरव्यवहारात सामील असलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अरुण उंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, संस्थेचे अध्यक्ष, प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि आणखी काही लोकांच्या मालकीच्या ४४ स्थावर मालमत्तांवर कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन” नाव लावण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या पतसंस्थेची संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर शहरात उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे आणि डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्यावर मृत रुग्णाच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रुग्णाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, त्यांचे पती दत्तात्रय दळवी यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना १ मार्च २०२५ रोजी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉ. अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन टाकण्याचा सल्ला दिला, याला रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने संमती दिली होती. मात्र, स्टेन टाकल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी हाताला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर शहरातील प्रभागांकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून ४७ सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी १४ हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून, या दिव्यांचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जनतानगरमधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाउसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संगमनेर विधानसभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या या सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध होऊन आपल्या सहजीवनाचा श्रीगणेशा करणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून लग्नावरील होणारी उधळपट्टी टाळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला जात असून, या उपक्रमाची २९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे. विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गरजवंत किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनीही ‘मालपाणी पॅटर्न’ला पसंती दिली आहे. १९९७ मध्ये स्वर्गीय ओंकारनाथजी आणि स्वर्गीय माधवलालजी…
विशेष प्रतिनिधी | मुंबई अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावलं जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, मुंबई/नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यानंतर, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यात तंत्र-मंत्र आणि अंगारे-धुपारे करून महिला व सामान्य नागरिकांचे शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सिन्नर येथील अशोक खरात याच्या कृत्यामुळे अनेक नागरिक शोषणाचे बळी ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूबाबाच्या कारस्थानात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह राज्यातील ३९ आमदार, विविध मंत्री, अधिकारी आणि अनेक राजकीय कार्यकर्ते एकतर सहभागी आहेत किंवा त्या अंधश्रद्धेचे बळी ठरले आहेत. संविधानिक पदांवर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संगमनेर नगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘रक्षक दल’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे संकेत मंत्री तटकरे यांनी दिले आहेत. या भेटीच्या वेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या. दुर्गा तांबे यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. चर्चेदरम्यान आदिती तटकरे यांनी संगमनेरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | आळेफाटा शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन धांदरफळ (ता. संगमनेर) येथे परतत असताना वाटेत नियोजनावरून वाद झाल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सुरेश खुरपे (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते धांदरफळ येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज खुरपे व त्यांच्या गावातील अंदाजे ७० लोक दिंडीनिमित्त शिखर शिंगणापूरला गेले होते. ३० मार्च रोजी ते सर्वजण पायी गावाकडे निघाले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हे लोक आळे रोडने जात असताना चार मोटारसायकलवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे अत्यंत आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव घुले येथील ग्रामस्थांना दिला. सावरगाव घुले येथे आयोजित खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून महाआरती केली. या कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश यापूर्वीच व्हायला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या निंदनीय घटनेतील पीडितेच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून, तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस विशेष उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून तिची उत्तम काळजी घेतली जात असून, विशेष समुपदेशकाद्वारे तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे समुपदेशन…
आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याच्या, राज्यातील जनतेच्या हिताचा जराही विचार न करता मनाला वाटेल तशा योजना जाहीर करणार्या सत्ताधार्यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा पुरता दोलायमान बनला आहे. करदात्यांच्या कष्टाच्या रक्कमेची ही लूट ज्यांनी केली ती त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे. या योजना जाहीर करताना राज्याचं काय होईल, इतकाही विचार त्यांनी केला नाही. केवळ सत्ता मिळावी, इतक्या कुटील हेतूने जाहीर झालेल्या योजनांनी महाराष्ट्राला बेजार केलंच पण राज्य जगावं म्हणून जे आपल्या खिशाला ताण देतात त्यांनाही जगणं मुष्कील करून टाकलं आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेने जनतेच्या सुमारे 21 हजार कोटी इतक्या रक्कमेला चुना लावल्याचं नुकतंच उघड झालंय. सुधारलेल्या महाराष्ट्राने देशाला लूट करण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विशेष दौऱ्यावर येत आहेत. मंत्री तटकरे यांनी आपला नियोजित विदर्भ दौरा रद्द करून रविवारी थेट लोणी (ता. राहाता) येथील रुग्णालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या भेटीला प्राधान्य मंत्री तटकरे आज शनिवारी या पिडीत मुलीची व मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांचा शनिवारचा दौरा अचानक रद्द झाला होता. संगमनेरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि पीडित मुलीला मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी तातडीने आपला दौरा बदलला आहे. पीडित मुलगी सध्या लोणी येथील हॉस्पिटलमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक नाशिकमधील सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेत एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा समोर आला असून, त्याने गेल्या दोन दशकांपासून अनेक गरीब महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्र एरंडे (वय ६३) असे या संशयित पत्रकाराचे नाव असून, तो एका साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहे. एरंडे हा सातपूर भागातील कामगारनगर आणि श्रमिकनगरमध्ये लघू उद्योगांसाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असे. लघू उद्योग सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्याने सन २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या काळात अनेक गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. या महिलांच्या हतबलतेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर समनापूर येथे दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी दिनेश मुरलीधर मिलाने यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दिनेश मिलाने हे हॉटेल व्यावसायिक असून समनापूर गावात त्यांचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी देवा शेरमाळे आणि वंदना शेरमाळे यांनी दुकानात येऊन तेथे दारूचा व्यवसाय करू नये, असे म्हणत दुकानातील कामगार संतोष रावसाहेब गवळी याला शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष यांनी घटनेची माहिती दुकानमालक दिनेश मिलाने यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून, आता हा असंतोष उघडपणे समोर आला आहे. या पराभवास जबाबदार धरत शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून पक्षाच्या शहर अध्यक्षांसह एका बड्या नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच नगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून न आल्याने ही नामुष्की ओढवल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या गंभीर पत्रव्यवहारात भाजपचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका पीए मार्फत गणपुले यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा नियोजित अहिल्यानगर जिल्हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. मंत्री तटकरे या शनिवारी संध्याकाळी लोणी येथे येऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेणार होत्या. या दौऱ्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र आता दौरा रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील वडगाव पान परिसरात १७ मार्च रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या एका चिमुरडीच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, राज्य सरकारने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, धरणासाठी विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विस्थापितांना न्याय मिळेपर्यंत आणि जमिनींचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या विस्थापनालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळातही या बांधवांना हक्काचे पाणी मिळालेले नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी भंडारदरा धरणाचे पाणी मिळत नसल्याने या भागातील आदिवासी आजही पाण्यापासून वंचित आहेत. याशिवाय, विस्थापितांना मोबदला म्हणून दिलेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले असून, माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आधीच आर्थिक तोट्यात गेला आहे. तर दुसरीकडे ऐन हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने भट्टीधारकांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शासनाने तातडीने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून व्यावसायिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक संघ, संगमनेर-अकोले यांच्या वतीने करण्यात आली आहे. वीटभट्टी व्यवसायाला अद्याप कोणतीही विमा योजना लागू नाही. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नाही. विमा कंपन्यांकडे दाद मागितली असता,…
