Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जपणाया महाराष्ट्रात सध्या वैचारिक संघर्षाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वारकरी संप्रदायावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांविरोधात ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार समर्थन केले आहे. विकास लवांडे सारख्या प्रवृत्तींना योग्य धडा शिकवण्याचे काम भंडारे महाराजांनी केले असून, ही कृती लाखो वारकरी भाविकांच्या भावनांचेच प्रतिबिंब असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या समाज माध्यमावरील अकाउंट मध्ये म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हा केवळ एक मार्ग नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि हिंदू अस्मितेचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. गेल्या काही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि मानवतेची शिकवण देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कठीण काळातही आपला विचार ठामपणे मांडण्यासाठी धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जाण्याची शिकवण दिली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असून, पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे असे हल्ले चिंतेची बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आळंदी येथे संत परंपरेचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेचा निषेध करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल १२ वर्षे चाललेल्या एका महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) या खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भैय्याजी बागडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. सुजाता गोडसे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाची पार्श्वभूमी २०१४ सालातील आहे. पीडित मुलगी १७ वर्षे ६ महिने वयाची असताना,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: लोणीच्या पिंपरी निर्मळ परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत १० मे पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या तपासात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा संबंधित गर्भवती महिलांच्या पतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तपासाची व्याप्ती आता पुण्यापर्यंत पोहोचली असून नेवासा येथील मुख्य आरोपी डॉक्टरने ज्यांच्याकडून हे मशिन खरेदी केले होते, त्या पुण्याच्या दोन आरोपींना लवकरच कागद घेऊन पुढील…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू मजबूत राहण्यासोबतच एखादी जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र संध्याकाळच्या वेळी जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ योगासनांसाठी द्यावा. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा असला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकास कामांत अग्रस्थानी असलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला पूर्णपणे डावलण्यात आले असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या पदरी ‘शून्य’ टक्के पीक विमा पडला आहे. हा प्रकार म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला एक राजकीय डाव असल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे. या संदर्भात आनंद वर्पे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारित आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: आपल्याला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक प्रबळ कृती कार्यक्रम आखण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांच्या प्रमुखांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे केले.  १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संगमनेर येथील डाव्या संघटनांच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व ‘ताम्रपट’ कादंबरीचे लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते संभाजी भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. पठारे म्हणाले की, मराठी हीच…

Read More

शिर्डी: शिंदेसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये वाढत्या तक्रारी आणि संघटनात्मक त्रुटींची दखल घेत, जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथे आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच नव्या जोमाने काम करणारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाढते मतभेद, संघटनात्मक कामातील मरगळ आणि तक्रारींचा ओघ पाहता हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेर, शिर्डी, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर या तालुक्यांमधील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सामंत यांनी जिल्हा संघटनेची दक्षिण व उत्तर अशा…

Read More

आजचे राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ उत्तम आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ: आर्थिक बाबतीत आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा लागेल. व्यापारात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल उचलावे. मिथुन: आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि एखादी चांगली बातमी समजेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि आनंदाचे वातावरण असेल. कर्क: आजचा दिवस थोडा धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. विनाकारण चिंता करणे टाळावे आणि सकारात्मक विचार ठेवावा. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत, ज्यामुळे आर्थिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, जामखेड: नगरपरिषदेमध्ये आपल्या मुला-मुलीचा जन्मदाखला मिळवण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक अभिजित जालीम भैसडे आणि कंत्राटी मदतनीस अहमद इलियास शेख अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराने नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या मुलांच्या जन्मदाखल्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला होता. हे दाखले देण्यासाठी लिपिक भैसडे याने दीड हजार रुपये प्रति दाखला याप्रमाणे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम अग्निशमन दलातील कंत्राटी मदतनीस अहमद शेख याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत…

Read More