Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर लोणी परिसरातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश करताना एका डॉक्टर्स एजंटला रंगेहाथ पकडले होते. चौकशीअंती यात श्रीरामपूर मधील नामांकित डॉक्टरचा समावेश असल्याचे समोर आल्याने या डॉक्टरलाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, राहता न्यायालयाने या नराधमांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आणखी काही डॉक्टर एजंट सामील असल्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे. एकिकडे शासन स्तरावर ‘बेटी बचाओ’चे नारे दिले जात असताना, दुसरीकडे समाजातील काही पांढरपेशी डॉक्टर कोवळ्या कळ्यांचा गर्भातच गळा घोटण्याचे पाप करत असल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. पिंपरी निर्मळ येथील छाप्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये यापूर्वी डॉ.…

Read More

आजचे राशीभविष्य:  मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुनी थकलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक परिश्रम करावे लागतील. धावपळ वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवेल, परंतु कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका. जवळच्या मित्राकडून मोलाचा सल्ला मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील. मिथुन: तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज तुम्ही अनेक समस्या सोडवू शकाल. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस…

Read More

संगमनेर तालुक्यात भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातील मोधळवाडी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात चुलती आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला. जया दत्तात्रय थोरात (वय २९) आणि अस्मिता दादाभाऊ थोरात (वय १६, दोन्ही रा. मोधळवाडी) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जया थोरात आणि अस्मिता थोरात या दुचाकीवरून मोधळवाडी घाट उतरत होत्या. याच वेळी समोरून घाट चढून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: ‘सौ शहरी एक संगमनेर’ या व्हाट्सअप ग्रुपवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर मधील श्याम तिवारी यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या संगमनेर मधील बहुतांशी व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमांवर कोणाबद्दलही आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रकार सुरू आहे. गेल्या काही दिवसात समाज माध्यमांवर केलेल्या अशा प्रकारच्या टीका टिपणीमुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमातून टीकाटिप्पणी आक्षेपार्ह स्वरूपात होत असल्याने अशा…

Read More

मेष आजचा दिवस प्रगतीकारक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करा. वृषभ आज तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. व्यापारात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यभरात आपल्या भोंदूपणाने आणि आर्थिक गैरव्यवहाराने खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी नाशिकमधून अटक केल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रियेत मोठा निर्णय झाला आहे. राहता न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत एसआयटीच्या ताब्यात असलेल्या आणि नऊ गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या एसआयटी कडून खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला मंगळवारी राहता न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आठ दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दिलेल्या या वाढीव कोठडीमुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशोक खरात आणि त्याच्या पत्नीवर शिर्डी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यावेळी प्रथमच संपूर्णतः डिजिटल पद्धतीने ही गणना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची संधी ‘स्व-जनगणना’ (सेल्फ इन्युमरेशन) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार तथा जनगणना अधिकारी धिरज मांजरे यांनी केले आहे. तालुक्यातील जनगणनेच्या कामकाजासाठी महसूल विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला असून, तहसीलदार…

Read More

अकोले : आदिवासी समुदायांना स्वशासनाचे अधिकार देणाऱ्या ऐतिहासिक ‘पेसा’ कायद्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभा मोबिलायझर्सची पदे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २००० मोबिलायझर्सवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात उद्या, ६ मे रोजी पुण्यात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. पेसा मोबीलायझर संघर्ष समिती आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) अधिनियम १९९६ अर्थात पेसा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी देशभर लागू झाला. या कायद्याची…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात कत्तलखान्यांचे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. वडगाव पान ते तळेगाव रोडवर हॉटेल अमर जवळ ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल दोन मृत बैलांसह २९ जनावरांची सुटका करण्यात आली असून, २३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवण्यात आली. सोमवारी रात्री एका विटकरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून (क्र. PB 05 L 4157) जनावरांना अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने भरून…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना संयम ठेवा, जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाहीत. मिथुन: दिवसाची सुरुवात थोडी धावपळीची होऊ शकते, मात्र दुपारनंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल.…

Read More