Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर: नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर मुख्याधिकारी प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी शनिवारी उशिरा फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्याधिकारी फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय सुखदान यांनी यापूर्वीही अनेकदा नियमबाह्य कामांसाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. १३ एप्रिल रोजी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या वादाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला भव्य जीर्णोद्धार आणि वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित असलेला बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान आगामी काळात संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे यांच्यासह मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी आणि मुलांच्या पोटगीची रक्कम न भरणाऱ्या पतीला संगमनेर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ‘देवा ग्रुप फाउंडेशन’ने पुढाकार घेतला होता. आरोपी सरफराज कादर खान पठाण (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याने न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी व दोन मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा १० हजार रुपये देणे बंधनकारक होते. मात्र, त्याने जाणीवपूर्वक या आदेशाचे उल्लंघन केले असून, त्याच्याकडे आतापर्यंत एकूण ३,९७,५०० रुपयांची थकबाकी जमा झाली होती. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला, तिचे वडील आणि दोन लहान मुलींसह देवा ग्रुपचे पदाधिकारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथे पोलीस निरीक्षक समीर…
देशाच्या संसदीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या लोकसभेत एनडीए (NDA) सरकारने १६ तारखेला १३१ वी घटना दुरुस्ती विधेयक मांडले. त्या विधेयकात “नारी शक्ती वंदन कायदा” व “मतदारसंघ पुनर्रचना” ह्या दोन गोष्टींचा अंतर्भाव होता. आजपर्यंत कुठलीही घटनादुरुस्ती होत असताना भारताच्या संवैधानिक व संसदीय परंपरेला साजेसे वर्तन हे कुठल्याही सरकारचे राहिले आहे. यावेळी मात्र असे घडले नाही. अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय महिला आरक्षणाच्या विधेयकात घुसवून सरकारने विरोधी पक्षांना तोंडावर पाडण्याचा कुटील डाव रचला होता. यावरील चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या नेत्या व वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांनी भर संसदेत संपूर्ण सभागृहासमोर अन विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष सरकारची पोलखोल…
लोकांचे प्रश्न आपणच सोडवतो, अशा सबबीखाली सत्ता राबवणार्या केंद्रातल्या मोदी सरकारला नव्याने आणू पाहत असलेल्या महिला विधेयकाने चांगलाच झटका दिलाय. देशातील प्रत्येक गटाचे त्यात महिलांचे आपणच तारणहार आहोत, अशा मस्तीतील सरकारला असा झटका मिळणं गरजेचंच होतं. कसंही वागलं तरी आपलं कोणी वाकडं करणार नाही, अशा घमेंडीत सरकारचा वारू उधळत होता. चुकीचे असंख्य निर्णय घेऊन ते जनतेवर लादण्याची मस्ती डोक्यात होती. त्यात चंद्राबाबू नायडू, पासवान, आठवलेंसारख्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने सरकारचं काही बिघडत नव्हतं. पश्चिम बंगाल आणि केरळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आपलंसं करण्यासाठीचे सगळे प्रयत्न फसल्यावर मोदी सरकारने अनपेक्षितपणे महिला आरक्षणाच्या विधेयकाचं लचांड पुढे केलं. अवाजवी बहुमताच्या जोरावर या विधेयकावरही स्वत:ला स्वार…
अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा महाराष्ट्र संवाद न्यूज, अहिल्यानगर: अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयोमर्यादेचे उल्लंघन करून विवाह लावून दिल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज, नेवासा: राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असून, शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे मराठी शिक्षणाचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. नेवासा तालुक्यातील विविध शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विदारक स्थितीवर बोट ठेवत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात डॉ. तांबे यांनी अनेक शाळांमधील शिक्षक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला. शिक्षक भरती प्रक्रिया प्रदीर्घ काळापासून रखडलेली असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षकांचे मुख्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात दैवी शक्तीचा दावा करून लोकांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजासह त्याच्या इतर साथीदारांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवून कॅन्सरसारखे गंभीर आजार मंत्राने बरे करण्याचा आणि अपत्यप्राप्तीचा दावा करून या टोळीने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ॲड. रंजना पंढरीनाथ पगार यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पुन्हा दाखल होताच संगमनेर तालुका पोलिसांनी मध्यरात्रीच भोंदू…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यातील शालेय शिक्षण विभागात सध्या सुरू असलेला प्रशासकीय गोंधळ आणि उत्तर महाराष्ट्रातील विस्कळीत झालेली शिक्षण व्यवस्था यावरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचत त्यांनी थेट राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र धाडले असून, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा न निघाल्यास २५ मे २०२६ पासून पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला घारगाव पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कारसह दरोड्याचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना केलेल्या चौकशीत या आरोपींनी घारगाव हद्दीत ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे कबूल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पुणे-नाशिक हायवेवर रात्रगस्त घालत होते. यावेळी डोळासणे गावच्या बोगद्याजवळ अंधारात एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा उदात्त विचार घेऊन काँग्रेसने देश उभारणीचे महान कार्य केले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये काही जातीय शक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असून, अशा धर्मांध शक्तींच्या विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा सुरू असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्री थोरात, ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून या तालुक्याला प्रगतीपथावर नेले आहे. युवक काँग्रेसने आयोजित केलेला हा ‘युवा संगम’ कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते व माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी आमदार उल्हासदादा पवार,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय…
आश्वी, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या. संकटाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नाशिकच्या सिडको आणि सातपूर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत सिडको परिसरातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपी अर्शील साबीर मन्सूरी याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर हॉटेल डेमॉक्रसी येथे नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला धमकावले आणि तिच्याकडील सोन्याची चैन व कानातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या गुन्ह्यात अर्शील मन्सूरीला मदत करणाऱ्या दीपक, हिमांशू, नितेश आणि प्रथमेश या त्याच्या साथीदारांविरुद्धही एमआयडीसी…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या…
मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मे २०२६ मध्ये या जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाने १२ मे २०२६ ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ५ वाजता निकालही जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या एकाच दिवसाकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल मिटकरी, शशिकांत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने रविवारी (१० मे) शहरात एका विशेष विनामूल्य कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली आहे. सह्याद्री महाविद्यालयातील के.बी. दादा देशमुख सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कथाकथन क्षेत्रातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कार्यशाळेत पुणे येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संचलित सानेगुरुजी कथाकथन प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष शामराव कराळे, अपर्णा निरगुडे आणि रमेशराव काळे हे अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कथा निवेदक कसा तयार…
