Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र सर्वात न्युज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज जनक्षोभ पाहायला मिळाला. तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांचा तीव्र निषेध करत, शहरातील हजारो नागरिकांनी आणि सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या निषेध सभेची सुरुवात झाली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, स्वतःला कितीही मोठे महाराज म्हणवून घेणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असू शकत नाहीत. उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये दाखल झाली असताना, एका दुर्दैवी प्रकाराने या जलयात्रेला गालबोट लागले आहे. भाजपच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे जलसंपदा तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपत्ती जलपूजा केल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमधील प्रवरा नदीकाठच्या जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात विसावली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी आमदाराचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलेली ही ‘गुंडगिरी’ आणि ‘असंस्कृतपणा’ राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून रविवारी संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या पुस्तकाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तांबे व थोरात बोलत होत्या. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली सुसंगतता आणि लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक वर्तन या विषयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी समाजमाध्यमाद्वारे आपले परखड मत व्यक्त केले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी महाराज नेमके कोण होते आणि त्यांचे स्वराज्य कोणत्या मूल्यांवर उभे होते, यावर नवीन पिढीमध्ये मंथन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ देत, ३९ वर्षांनंतरही या पुस्तकाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले. शाळेत शिकवले जाणारे महाराज आणि प्रत्यक्ष इतिहासातील महाराज यांच्यातील तफावतीबद्दल त्यांच्या कन्या अहिल्या हिने…
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकावर आक्षेप घेणार्या बुलढाणातील आमदार संजय गायकवाड याने महाराष्ट्राची लाज शरमेने वाकवली आहे. छत्रपती शिवरायांचे कर्तेधर्ते आपणच असल्याचा आव आणत पुस्तकावरील आक्षेपाला ज्या शिवराळ भाषेत या आमदाराने उत्तरं दिली ती पाहिली की हा आमदार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असंच दिसतं. महाराष्ट्राची लाज घालवणार्या कितीजणांना सत्ताधारी पोसणार आहेत, हा खरा सवाल महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. सिंदखेड राजा या बुलढाणातील नावाजलेल्या ठिकाणची जहागीरदारी जणू या गायकवाडच्या घरचीच. शिवरायांच्या बालपणी स्वराज्याचं बीज ज्या जन्मस्थानी पेरलं त्या जिल्ह्यामधून असा आमदार आपण निवडून पाठवतो, याची लाज तिथल्या जनतेला वाटत असेल. मुळात शिक्षणाची वाणवा असलेल्या या आमदाराला…
मुंबई, विशेष प्रतिनिधी – शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण तापले आहे. या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाचे संपादक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप माकपने केला आहे. गायकवाड यांनी वापरलेली भाषा सभ्य समाजाला न शोभणारी असून, महिलांचा अवमान करणारी आहे. एकीकडे नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या…
संगमनेर: प्रतिनिधी ज्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आज काही विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे काळवंडण्याचा प्रयत्न होत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन शिवविचारांचा अपमान केला आहे, त्याला आता वैचारिक मार्गाने उत्तर देण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, रविवारी (२६ एप्रिल) सकाळी आठ वाजता संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचा खरा इतिहास जनमानसात मांडला जाणार आहे. या सामूहिक वाचनानंतर सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक परिसरात गायकवाड यांच्या निषेधार्थ एल्गार पुकारला जाणार आहे. सत्तेच्या गुर्मीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा बाजार मांडणाऱ्या आणि स्वतःला ‘देवमाणूस’ म्हणवून घेणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. पोलिसांनी या भोंदूच्या काळ्या साम्राज्याचा चक्काचूर केला असला, तरी या संपूर्ण प्रकरणात संगमनेरातील उच्चभ्रू डॉक्टरांच्या संघटनेने धारण केलेले मौन आता टीकेचे धनी ठरत आहे. समाजात अंधश्रद्धा पसरवून वैद्यकीय विज्ञानालाच आव्हान देणाऱ्या या भोंदूगिरीविरोधात ब्र काढण्याची तसदीही या संघटनेने घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या रॅकेटचा पर्दाफाश केला, मात्र ज्यांच्या डोळ्यादेखत हे दुकान सुरू होते, ते सुशिक्षित डॉक्टर हा प्रकार माहिती असून देखील नेमके कुणाच्या दबावाखाली गप्प होते, असा जळजळीत सवाल आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा आणि आजारपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी अक्षरशः चक्काचूर केला आहे. स्वतःला देवमाणूस म्हणवून घेणाऱ्या या भोंदूने संगमनेरसह अहिल्यानगर, नेवासा आणि राहता अशा मोक्याच्या ठिकाणी तब्बल १३ मालमत्तांचे जाळे विणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मालमत्ता स्वतःसह पत्नी, मुलगा आणि मुलीच्या नावावर चढवून या महाभागाने माया जमवली असून, पोलिसांनी आता या सर्व कागदपत्रांची जंत्रीच हाती घेतली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना बाबाच्या पापाचा घडा कसा भरला, याची सविस्तर माहिती दिली. बाबाच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी २००…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार खात्याचे अधिकारी आर. एस. वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. यावेळी मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, मावळते व्हाईस चेअरमन संतोष चांडक यांच्यासह संचालक मंडळातील अनिल अट्टल, योगेश जाजू, श्रीकांत मणियार, ज्योती कासट, विशाल नावंदर, अनिल कलंत्री, निलेश बाहेती, योगेश रहातेकर, मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी आणि व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची आर्थिक संस्था म्हणून ओळख…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून, सुमारे १७ लाख कर्मचारी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्याची अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आणि शासनासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर वडगाव पान (संगमनेर) येथील दत्तधाम सरकार आश्रमाचा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार तात्काळ बरे करण्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी गडगेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याला अटक केली होती. सुरुवातीची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी २७ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत केली आहे. राजेंद्र गडगे याच्यावर आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी संगमनेरमध्ये वास्तव्यास असताना तिची मकरंद गोडगे याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, सप्टेंबर २०२५ मध्ये मकरंदने तिला भेटण्यासाठी आपल्या खोलीवर बोलावले. तिथे गेल्यानंतर त्याने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’मार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत संगमनेरचे चित्रकार आनंद गायकवाड यांनी यश संपादन केले आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर त्यांनी रेखाटलेल्या चित्राची देशभरातील ७५ उत्कृष्ट कलाकृतींमध्ये निवड करण्यात आली आहे. प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे ललित कला अकादमीच्या सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात आनंद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, सांस्कृतिक कार्य विभागाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: लोकसभेत मांडण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या धोरणांविरोधात संगमनेर शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला. बसस्थानक परिसरात एकत्र येत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांनी हातात बांगड्या घेऊन आणि निषेधाचे फलक झळकावून परिसर दणाणून सोडला होता. नारीशक्ती वंदन अधिनियम हा केवळ कायदा नसून ती ‘मोदींची गॅरंटी’ आहे, ज्याद्वारे महिलांना सन्मान आणि समान संधीची खात्री मिळणार आहे. या विधेयकामुळे ग्रामीण भागातून नवीन आणि कर्तृत्ववान महिला नेतृत्व पुढे येण्यास मदत होणार असताना, काँग्रेसने मात्र महिला शक्तीला नाकारून केवळ घराणेशाहीला महत्त्व दिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ आश्रमाचा सर्वेसर्वा भोंदू बाबा गडगेबाबा याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. पोलीस कारवाईत आश्रम सील झाल्यानंतर आता महावितरणनेही या भोंदू बाबाला दणका दिला असून, वीज चोरी प्रकरणी सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. अधिकृत मीटरला बायपास करून ही वीज चोरी केली जात असल्याचे तपासात उघड झाले असून, आठवडाभरात दंडाची रक्कम न भरल्यास बाबावर वीज चोरीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. गेल्या तीन दशकांपासून अडल्या-नडल्या लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या या बाबाच्या काळ्या कर्तृत्वाच्या कथा आता एकामागून एक समोर येऊ लागल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पंचायत समिती मारहाण प्रकरणी अभिषेक थोरात आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी या प्रकरणातील सर्व चारही अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस पक्षाचे नेते शरद नाना थोरात व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, अर्जदारांच्या वतीने ॲड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी शिवसेनेत सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमांकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपशी युती करून आपली पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी निवडून आणल्यानंतर, आमदार शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभा आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिले. या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधला. आपल्याला या कार्यक्रमाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध इतिहासातून प्रेरणा घेऊन निरोगी व प्रगल्भ समाज घडवण्यासाठी तरुणांनी राज्यघटना, लोकशाही आणि संत परंपरेचा विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘युवा संगम’ हा कार्यक्रम भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श मार्गदर्शक ‘पॅटर्न’ ठरेल, असा विश्वास राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय युवा संगम कार्यकर्ता शिबिर व संवाद कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या शिबिरामध्ये संगमनेर तालुक्यातील ५६० युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक आणि…
